मूर्ती चोरणा:या पिता-पुत्राला अटक
By admin | Published: March 30, 2017 05:03 PM2017-03-30T17:03:23+5:302017-03-30T17:03:23+5:30
गोलाणी मार्केटमधील जलाराम गिफ्ट हाऊस या दुकानातून गाय-वासराची मूर्ती चोरणा:या सुनील नारायण शिंदे (वय 50) व चंद्रशेखर सुनील शिंदे (वय 18) या दोन्ही पिता-पुत्रांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
Next
चोरलेली मूर्ती हस्तगत : घरात आढळले मसाल्याचे पाकीट
जळगाव,दि.30-गोलाणी मार्केटमधील जलाराम गिफ्ट हाऊस या दुकानातून गाय-वासराची मूर्ती चोरणा:या सुनील नारायण शिंदे (वय 50) व चंद्रशेखर सुनील शिंदे (वय 18) या दोन्ही पिता-पुत्रांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या दोघांनी 27 मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता मूर्तीची चोरी केली होती. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. दरम्यान, त्यांच्याकडून चोरलेली मूर्ती हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गोलाणी मार्केटमधील जलाराम गिफ्ट गॅलरी या दुकानातून मूर्ती चोरी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फुटेजच्या आधारावर पोलीस पथकाने बुधवारी रात्री 11.30 वाजता कोल्हे हिल्स परिसरातील संशयिताच्या घराजवळ सापळा लावला. मात्र, पोलीस आल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही पितापुत्र रात्रीच गायब झालेत आणि घरी आलेच नाहीत. सकाळी 8 वाजेच्या सुमारास ते घरी आले. त्यावेळी शहर पोलिसांच्या पथकाला पिता-पुत्र घरी आल्याची माहिती मिळताच त्यांनी कोल्हे हिल्स परिसर गाठून दोघांना ताब्यात घेतले.
घर झडतीत सापडले मसाल्याचे पाकीट
शिंदे पिता-पुत्राला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांनी जलाराम गिफ्ट हाऊसमधून चोरलेली गाय-वासराची मूर्ती त्यांच्या घरातून हस्तगत केली आहे. तसेच त्यांच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीच्या मसाल्यांची पाकिटेही सापडली असून ते सुद्धा त्यांनी चोरलेले असल्याचा पोलिसांना संशय आहे. दोघांनी मूर्ती चोरी केल्याची कबुली दिली आहे.
फळेही चोरल्याचा संशय
दरम्यान, या पिता-पुत्राने जिल्हाधिका:यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या फळ विक्रेत्याकडून फळे तसेच ओंकारेश्वर मंदिराजवळ फुलं विक्रेत्यालाही अशाच पद्धतीने गंडविल्याचे समोर आले. दुचाकी चोरीत त्यांचा सहभाग आहे का? याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.