चीनने कर कमी केल्यास कापूस भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:41 PM2019-02-01T12:41:16+5:302019-02-01T12:42:42+5:30

आंतराष्टÑीय कॉटन असोसिएशनच्या बैठकीकडे लक्ष

If China reduces its tax, cotton prices will increase | चीनने कर कमी केल्यास कापूस भाव वाढणार

चीनने कर कमी केल्यास कापूस भाव वाढणार

Next
ठळक मुद्दे क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांचा लाभ !


अजय पाटील 
जळगाव : चीनने बाहेरून येणाऱ्या कापसाच्या आयातीवर लावलेला २५ टक्के टेरीफ (कर) जर कमी केला तर त्याचा परिणाम आंतरराष्टÑीय बाजारातील कापसाच्या दरावर होण्याची शक्यता आहे. यामुळे न्युयॉर्क कॉटन असोसिएशनकडून कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यतात्याचा परिणाम भारतातील कापसाच्या दरावर होवून कापसाच्या दरात क्विंटल मागे २०० ते ३०० रुपये दराने वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती कापूस भावाचे जाणकार व जिनर्स हर्षल नारखेडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
१ फेब्रुवारी रोजी न्युयॉर्कमध्ये चीन व अमेरिकेसह आंतराष्टÑीय कॉटन असोसिएशनच्या पदाधिकाºयांची बैठक होणार आहे. या बैठकीत चीनकडून कापसाच्या आयातीवर लावण्यात आलेल्या कराबाबत चर्चा होणार आहे. अमेरिका य चीनच्या ‘ट्रेडवॉर’ मुळे दोन्ही देशांनी आपल्या देशात आयात होणाºया मालावर अतिरीक्त कर लावलेला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्टÑध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला भेट दिली होती. या दौºयावर असताना त्यांनी एकमेकांच्या मालावर लावण्यात आलेल्या करावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्याच दौºयानंतर कॉटन असोसिएशनची बैठक होणार असल्याने याबैठकीकडे कापूस उद्योगातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.
२०० ते ३०० रुपयांची होवू शकते वाढ
या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास भावात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कापसाचे दर ५३०० ते ५४५० इतके आहेत. दर न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजने भाव वाढवल्यास भारतात देखील २०० ते ३०० रुपयांनी कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीत तोडगा न निघाल्यास भाव वाढण्याची एकमेव आशा संपुष्टात येण्याचीही शक्यता आहे. कारण आंतरराष्टÑीय बाजारात भारतीय निर्यातदारांचे दररोज सौदे रद्द होत आहेत. सूतला मागणी नाही अशा परिस्थितीत भाव वाढण्याची शक्यता कमी आहे.
त्या बैठकीचा भारतावर कसा परिणाम
आंतरराष्टÑीय बाजारात कापसाचे दर हे न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजकडून ठरवले जातात. दरम्यान, यंदा कापूस आयातदार देशांमध्ये मुख्यत्वेकरून अमेरिकेकडून कापूस घेतला जात आहे. त्यामुळे सुरुवातीला न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजने कापसाच्या दरात वाढ केली होती. मात्र, ट्रेडवॉर सुरु झाल्यानंतर चीनने अमेरिकेकडून येणाºया कापसावर २५ टक्के टेरिफ (कर) लावल्याने न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजने कापसाच्या दरात घट केली. जेणेकरून अमेरिकेच्या कॉटन निर्यातदारांना चीनने लावलेल्या करावर दिलासा मिळू शकतो.
याचा परिणाम आंतरराष्टÑीय कापसाच्या भावावर झाला. त्यातच चीनने भारताकडून कापसाची आयात थांबविल्यामुळे भारतातील कापसाचे दर कमी झाले. आता चीनने अमेरिकेच्या कापसावर लावलेला कर कमी किंवा रद्द केला. तर न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजकडून पुन्हा भावात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतातील कापसाच्या दरावर देखील होण्याची शक्यता आहे.
स्थानिक बाजारात व्यापाºयांकडून शेतकºयांची लुट सुरुच
स्थानिक बाजारात कापसाच्या दरात घट झाली असून, आता हमीभावापेक्षा कमी दरात देखील व्यापारी शेतकºयांकडून माल घेण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने ५४५० प्रतिक्ंिवटल इतका भाव निश्चित केला आहे. मात्र, व्यापारी प्रत्यक्षात शेतकºयांकडून ५ हजार ते ५३०० दरात कापूस खरेदी करत असल्याचे दिसून येत आहेत. व हाच कापूस जिनर्स व इतर व्यापाºयांकडे जास्त भावात दिला जात आहे. हमीभावापेक्षा कमी दरात कापूस घेणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

Web Title: If China reduces its tax, cotton prices will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.