वडिलांकडे जातवैधता प्रमाणपत्र असल्यास मुलांनाही देणार

By admin | Published: July 7, 2017 12:03 PM2017-07-07T12:03:13+5:302017-07-07T12:03:13+5:30

सामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा : शिष्यवृत्तीचा लाभ द्या

If the father has caste validity certificate, he will also give the children the same | वडिलांकडे जातवैधता प्रमाणपत्र असल्यास मुलांनाही देणार

वडिलांकडे जातवैधता प्रमाणपत्र असल्यास मुलांनाही देणार

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव ,दि.7 - वडिलांना जातवैधता दिली असेल तर मुलांनाही देण्याची मागणी होती. त्यानुसार महिनाभरात कार्यवाही करू, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन पंधरवडय़ानिमित्त विभागीय गुणगौरव सोहळा गुरुवारी दुपारी जिल्हा नियोजन भवन येथे झाला . त्या वेळी ते बोलत होते.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचा एकत्रितपणे प्रय} करून दलित, मागासवर्गीय समाजांनी प्रगती साधावी. महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेत गरजूंनी व्यवसाय करावा,  त्याबरोबरच कर्जफेडही करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपदावरून बोलताना  केले. 
कजर्फेड होत नसल्याने महामंडळे अडचणीत
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अनेक लाभार्थी कर्ज घेतात; पण त्याची फेड करत नाहीत. त्यामुळे महामंडळे अडचणीत आली असल्याचे सांगत नियमित फेड करण्याचे आवाहन केले. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारप्राप्त, विविध योजनांचे लाभार्थी, गुणवंत विद्यार्थी, आंतरजातीय विवाह करणारे दाम्पत्य, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेत प्रगती साधणा:या लाभार्थीचा सत्कार करण्यात आला.
 

Web Title: If the father has caste validity certificate, he will also give the children the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.