गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, तरी खटला मागे घेऊ, एकनाथ खडसे यांचा प्रस्ताव

By विलास.बारी | Published: June 19, 2023 08:03 PM2023-06-19T20:03:29+5:302023-06-19T20:03:42+5:30

गुलाबराव पाटलांच्या विरोधातील अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी कामकाज

if Gulabrao Patil apologizes, we will withdraw the case, Eknath Khadse's proposal | गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, तरी खटला मागे घेऊ, एकनाथ खडसे यांचा प्रस्ताव

गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, तरी खटला मागे घेऊ, एकनाथ खडसे यांचा प्रस्ताव

googlenewsNext

विलास बारी
जळगाव :
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपण दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात, माफी मागितली तरी आपण खटला मागे घेऊ, असा प्रस्ताव आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात २०१६ मध्ये केलेल्या वक्तव्याविरोधात, खडसे यांनी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी न्यायालयात कामकाज झाले. त्यासाठी खडसे सोमवारी न्यायालयात आले असताना, ते पत्रकारांशी बोलत होते.

याप्रकरणी खडसेंनी पुरावे म्हणून काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली. तसेच या कागदपत्रांसंदर्भात न्यायालयात शपथपत्रदेखील सादर केले. या खटल्याबाबत मागील आदेश तसेच ठेवून गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील अब्रुनुकसानीचा खटला पुढे सुरू ठेवावा, अशी विनंती न्यायालयात केली. दरम्यान, गुलाबराव पाटील यांचे नाव सोमवारी दोन वेळा न्यायालयाने पुकारले. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः किंवा त्यांचे वकील यापैकी कुणीही कोर्टात हजर झाले नाही. या खटल्याची मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण...

तत्कालीन युती सरकारमध्ये एकनाथ खडसे हे कृषिमंत्रीसह बारा खात्यांचे मंत्री असताना त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून स्वतःच्या शेतावर ४० लाखांचे पॉलिहाऊस त्याचप्रमाणे त्यांच्या मुक्ताईनगर सूतगिरणीसाठी सरकारकडून दीडशे कोटी लाटले, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. या आरोपांवरून एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात २०१६ साली ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना, खडसे आणि गुलाबराव पाटील हे या सरकारच्या काळात एकत्र सत्तेत होते. त्यावेळेस खडसेंनी किमान एक रुपया नुकसान भरपाई द्यावी, असा प्रस्ताव दिला होता. तो गुलाबराव यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर पाच वेळा या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी काही काळ लांबली होती.

मंगेश चव्हाणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार
येत्या दोन दिवसांत आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती खडसेंनी दिली. मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील कथित भ्रष्टाचार तसेच इतर कारणांवरून आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यामुळे जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत खडसेंनी मंगेश चव्हाण यांच्यावर दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दिली.

Web Title: if Gulabrao Patil apologizes, we will withdraw the case, Eknath Khadse's proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.