"सोबत आला तर तो सेट, विरोधात गेला तर शूट हीच भाजपची नीती"; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

By विलास.बारी | Published: November 3, 2022 05:49 PM2022-11-03T17:49:32+5:302022-11-03T17:55:51+5:30

आमदार संजय शिरसाठ आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

If it comes along, then set, if it goes against, shoot is the policy of BJP says Sushma Andhare | "सोबत आला तर तो सेट, विरोधात गेला तर शूट हीच भाजपची नीती"; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

"सोबत आला तर तो सेट, विरोधात गेला तर शूट हीच भाजपची नीती"; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Next

जळगाव - शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून अनेकजण परतीच्या वाटेवर आहेत. त्यात आमदार संजय शिरसाठ आघाडीवर असून ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. अनेकांना मंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतरही, त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याने आता शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

गुरुवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. यावेळी युवासेनेचे विस्तारक शरद कोळी, शिवसेनेचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपकडून विरोधी पक्ष संपवण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

भाजपावर जोरदार टीका

१. भाजपकडून देशातील स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना ईडीचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
२. भाजपसोबत गेला की भाजप त्याला सेट करतं, त्यांच्या विरोधात गेला तर शूट करते, हीच भाजपची नीती असल्याची टीका अंधारे यांनी केली.
३. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुरक्षा काढायची अन् अमृता फडणवीसांना सुरक्षा देण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा टोला त्यांनी लगावला.
४. जाती-धर्मांत विभागून जनतेत फूट पाडण्याचा भाजपचा कुटील डाव असून, हा डाव जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठीच महाप्रबोधन यात्रा काढण्यात आल्याची माहिती अंधारे यांनी दिली.
५. संभाजी भिडे यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत केलेल्या गैरवर्तणुकीचा यावेळी अंधारे यांनी निषेध व्यक्त केला.

"त्या सत्तांतराचे मास्टरमाइंड फडणवीसच..."

रवी राणा व बच्चू कडू यांच्यात सुरू असलेल्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. तसेच माझ्या एका फोनवर बच्चू कडू यांनी शिंदे गटाला समर्थन दिले, असे फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील त्या सत्तांतरात आमचा काहीही सहभाग नसल्याचे सांगणाऱ्या भाजपचा खरा चेहरा समोर आला असल्याचे अंधारे यांनी सांगितले. त्या सत्तांतराचे मास्टरमाइंड फडणवीसच होते, हे यावरून स्पष्ट झाल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

Web Title: If it comes along, then set, if it goes against, shoot is the policy of BJP says Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.