नेते निष्क्रिय असतील तर पक्षाचे काम हाती घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:26+5:302021-04-25T04:15:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील नेते जर निष्क्रिय असतील तर एनएसयूआयच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाचे काम हाती घ्यावे, असा सल्ला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील नेते जर निष्क्रिय असतील तर एनएसयूआयच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाचे काम हाती घ्यावे, असा सल्ला एनएसयूआय आणि युवक काँग्रेसचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी दिला. तसेच काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी इशारादेखील दिला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने एनएसयूआय जिल्हा अध्यक्षांची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्याचे एनएसयूआय व युवक काँग्रेसचे प्रभारी आमदार कुणाल पाटील, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या एनएसयूआय जिल्हाध्यक्षांकडून संघटनेच्या कार्याबद्दल केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामाचा अहवाल सादर केला.