काळजी घेतली न गेल्यास संसर्ग अधिक वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:16+5:302021-03-22T04:15:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काळजी न घेणे यामुळे संसर्ग तर उशिरा रुग्णालयात दाखल होणे, यामुळे मृत्यूचे प्रमाण चोपड्यात ...

If left unmanaged, they can be left astray and lose the right path | काळजी घेतली न गेल्यास संसर्ग अधिक वाढणार

काळजी घेतली न गेल्यास संसर्ग अधिक वाढणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काळजी न घेणे यामुळे संसर्ग तर उशिरा रुग्णालयात दाखल होणे, यामुळे मृत्यूचे प्रमाण चोपड्यात वाढले आहे. आगामी काळात नागरिकांनी काळजी न घेतल्यास संसर्गाचे प्रमाण अधिकच वाढेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी म्हटले आहे. चोपड्याच्या बाबतीत विशेष सतर्कतेचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

चोपडा येथील स्थानिक रुग्णसंख्या व प्रशासनाकडून जाहीर होणारी रुग्णसंख्या यात तफावत समोर येत असल्याबाबत विचारणा केली असता, सायंकाळी पाचनंतर आलेले अहवालांना दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांना दिले जातात, त्यामुळे प्रशासकीय आकडेवारी व स्थानिक आकडेवारी यात तफावत असते, असे डॉ.चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मास्क परिधान करणे, हात स्वच्छ ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, या बाबी पाळल्यास संसर्ग रोखता येऊ शकतो, चाळीसगाव, जामनेर व जळगाव शहरात काहीसे रुग्ण कमी आढळून येत असून, चोपड्यात मात्र रुग्ण अधिकच वाढत असल्याने, या ठिकाणी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉ.चव्हाण यांनी म्हटले आहे.

Web Title: If left unmanaged, they can be left astray and lose the right path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.