मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात हुकूमशाही येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 09:43 PM2019-03-28T21:43:29+5:302019-03-28T21:44:23+5:30

दिलीप वळसे- पाटील यांनी जळगाव येथील आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त केली भिती: भाजपा सरकारचे दडपशाहीचे धोरण

If Modi becomes the Prime Minister then the dictatorship will be in the country | मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात हुकूमशाही येणार

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात हुकूमशाही येणार

Next
ठळक मुद्देगिरीश महाजनांची मस्ती उतरवा- डॉ. सतीश पाटीलभाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही- देवकर



जळगाव: भाजपा सरकारचे दडपशाहीचे धोरणअसून सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल जात आहे. भाजपा सरकार पुन्हा निवडून आल्यास देशात मोदी हे हुकुमशाहीच आणतील. यामुळे ही निवडणूक देशातील लोकशाहीच्या अस्तित्वासाठीची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे- पाटील यांनी येथील मेळाव्यात केले.
जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी येथील शिवतीर्थ मैदानावर आघाडीचा मेळावा झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार सुधीर तांबे, आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, अरुण पाटील व दिलीप सोनवणे, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगर अध्यक्ष नामदेवराव चौधरी, सजंय गरुड, शशिकांत साळुंखे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, अभिषेक पाटील, ललित बागुल, योगेश देसले, वाल्मिक पाटील, उज्वल पाटील, उमेश पाटील, तिलोत्तमा पाटील, मंगला पाटील, सविता बोरसे, कल्पिता पाटील, निला चौधरी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, महानगरअध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डी. जी. पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, राजस कोतवाल, उदय पाटील, आरपीआय गवई गटाचे अध्यक्ष कल्पेश मोरे आदी उपस्थित होते.
रावेरचा उमेदवार लवकरच जाहीर होणार
जळगाव लोकसभा मतदार संघात आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे. रावेर मधूनही चांगला उमेदवार दिला जाईल. आज रात्रीपर्यंत अथवा उद्यापर्यंत उमेदवार जाहीर होईल, असे सांगत दोन्ही मतदार संघातून पक्षाच्या विजयासाठी जोमाने काम करावे,असे आवाहन वळसे पाटील यांंनी केले.
भाजपाचे तिकीट तोडीपानीवाल्यांना !
प्रचंड मताधिक्याने गेल्या निवडणुकीत विजयी होवून सुद्धा भाजपाचे खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट का कापले गेले ? असं काय झालं...हा सवाल गिरीश महाजनांना विचारा, असे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच या खासदाराला का निवडून दिले हा देखील विचार करा. आता पुन्हा ती चूक करु नका असे आवाहनही त्यांनी केले. तर पाटील यांना महाजन तसेच भाजपा जिल्हाध्यक्षांनी ब्लॅकमेल केले पैसे पोहचूनही तिकिट मिळाले नाही, एवढेच नाही तर तोडीपाणीवाल्यांना तिकीट दिले असा आरोपही डॉ. पाटील यांनी केला.
गिरीश महाजनांची मस्ती उतरवा- डॉ. सतीश पाटील
गिरीश महाजन यांना आभाळ दोन बोटेच शिल्लक असल्यासारखे झाले आहे, आता त्यांना आता खाली उतरवा असे आवाहनही डॉ. सतीश पाटील यांनी केले. महाजन हे जलसंपदा मंत्री असताना जिल्'ात काहीही कामे झालेले नाही. जिल्'ातला दोन मंत्री आणि एक अर्धा मंत्री असताना जिल्हा वाऱ्यावर आहे. डीपीडीसीच्या बैठकीही वेळेवर होत नाही, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली.
भाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही- देवकर
गुलाबराव देवकर यावेळी म्हणाले की, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मनपा निवडणुकीत सांगितले होते की, आम्हाला सत्ता दिल्यास ३०० कोटी आणू आणि शहराचा विकास करु अन्यथा पुढील निवडणुकीत मते मागणार नाही. मात्र आज ८ महिने झाले तरी १ रुपयाआणला नाही. शहराची पहिल्यापेक्षाही दुरावस्था झाली आहे. ग्रामीण भागातही विकास नाही. यामुळे भाजपाला मते मागण्याचाच अधिकार नाही, अशी टिका गुलाबराव देवकर यांनी केली.
मेळाव्याच्या सुरुवातीला शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेळावा समाप्ती नंतर रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत देवकर यांनी जिल्हाधिकारी येथे रॅलीसहपायी जावून अर्ज दाखल केला. यावेळी विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Web Title: If Modi becomes the Prime Minister then the dictatorship will be in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.