तर लोकप्रतिनिधी आता गप्प का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:36 PM2019-03-17T12:36:51+5:302019-03-17T12:36:57+5:30

शिवाजीनगर उड्डाणपूल

If people are silent then why? | तर लोकप्रतिनिधी आता गप्प का..

तर लोकप्रतिनिधी आता गप्प का..

Next


सचिन देव
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपूल १५ दिवसांपासून बंद झाल्यामुळे, गेल्या आाठवड्यात अग्नीशामक बंब वेळीच न पोहचल्यामुळे अनेक गरिबांचे संसार आगीत खाक झाले तर दोन दिवसांपूर्वी वेळीच उपचार न मिळाल्यामुळे एका बालकाला आपले जीव गमवावा लागला. लागोपाठ या आठवड्यांत शिवाजीनगरत या दोन गंभीर घटना घडुनही, प्रशासनासह लोकप्रतिनिधी या घटनांवर साधा शोक व्यक्त करतांना दिसून आले नाही.अनेकवेळा सामाजिक प्रश्नासाठी महासभेत आवाज उठवणारे, पुढे-पुढे करणारे लोकप्रतिनिधी आता गप्पा का ? असा प्रशन सर्व सामान्य जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.
जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यांत या उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करुन, पूलाच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे पूलावरील वाहतुक सुरत गेट मार्गे वाहतुक वळविण्यात आल्याने नागरिकांना दररोज १० किलोमीटरचा फेरा पडत आहे.या फेऱ्यातुन प्रवासा करतांना रस्त्यावरील वाहतुक कोंडी व गेट मध्ये वाहन अडकल्यावर होणाऱ्या विलंबामुळे जळगावकरांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
दररोज या ठिकाणाहुन शिवाजीनगरातील रहिवाशांसह परिसरातील गावांमधुन सुमारे १० हजार वाहनधारक ये-जा करित असतात. सुरत गेट हा एकच पर्यायी मार्ग असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तहसिल कार्यालयाजवळ पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना व आपत्कालीन परिस्थितीसाठी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे. पूलाचे काम दोन वर्ष चालणार असल्याने, रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तात्पुरते गेट उभारण्यासाठी रहिवाशांना न्यायालयाचे देखील दार ठोठावे लागले आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्त्याची मागणी फेटाळुन लावल्याने, शिवाजीनगरातील हातावर पोट भरणाºया नागरिकांना स्व:त पैसे खर्च करुन, न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. या पेक्षा आणखी दुर्देव काय म्हणावे..
शिवाजीनगर वासियांचा शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाला विरोध नसुन, प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जर पर्यायी रस्ता उपलब्ध झाला असता, तर ‘त्या ’आगीवर नियंत्रण मिळवता आले असते आणि ‘त्या’ बालकाचाही जीव वाचला असता. शिवाजीनगर उड्डाणपूल काहीही करुन होणारचं आहे. मात्र, त्या बालकाचा जीव परत येणार आहे का ? असे असतानांही मतासांठी मतदारांचा पाय पडणारे,त्यांना प्रलोभने दाखविणारे,ऐवढे झाल्यानंतर आवाज उठवतांना का दिसत नाहीत, आताच मौन गिळुन गप्प का..

Web Title: If people are silent then why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.