परिस्थिती गंभीर होतेय, आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:04 PM2021-04-13T23:04:31+5:302021-04-13T23:05:07+5:30

आज जे तीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत ते कोरोना स्प्रेडर होत असून, ही बाब प्रशासनाने गंभीरपणे घ्यावी, आरोग्य विभागातील ढिसाळपणा बंद करावा, अशा सक्त सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्या.

If the situation becomes serious, stop the laxity in the health system | परिस्थिती गंभीर होतेय, आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा

परिस्थिती गंभीर होतेय, आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा

googlenewsNext
ठळक मुद्देखासदार उन्मेश पाटील : चाळीसगावातील कोरोना स्थितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. नागरिक ट्रॉमा केअर सेंटर येथे जाऊन पुन्हा अंधशाळा येथे जातात. यासाठी गावात फलक लावून जनतेला दिलासा द्या. होम क्वारंटाइन रुग्णांची तपासणी काळजीपूर्वक होत नसून, तशी सूचना परिसरात होत नसल्याने संबंधित कोरोना रुग्ण इतरांपर्यंत हा आजार पसरवतो, ही वस्तुस्थिती आहे. आज जे तीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत ते कोरोना स्प्रेडर होत असून, ही बाब प्रशासनाने गंभीरपणे घ्यावी, आरोग्य विभागातील ढिसाळपणा बंद करावा, अशा सक्त सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्या.

खासदार उन्मेश पाटील यांनी कोरोनाबाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, उपसभापती सुनील पाटील, डॉ. मंगेश वाडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, पालिका ओ. एस. स्नेहा फडतरे, सहायक गटविकास अधिकारी आर. आय. पाटील, डी. डी. शिर्के, नगरसेवक नितीन पाटील, विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते.

मागेल त्याला लसीकरण तसेच हवे त्यांची टेस्ट करावयाचे आदेश देण्यात आले असून, अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून आठ तास लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी सुरू ठेवा, असे आदेश देण्यात आले. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. ग्रामीण भागात लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी मोहीम राबवावी. यासाठी आठ ते दहा अतिरिक्त पथके तयार करून विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हे लसीकरण करावे, अशी व्यवस्था केली जाणार आहे.

ग्रामीण रुग्णालयात पन्नासपैकी वीस बेड कार्यान्वित झाले नव्हते. तातडीने जिल्हाधिकारी २० बेडला फ्लोमीटर उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा स्थानिक पातळीवर खरेदीचे अधिकार द्या, अशी सूचना मांडली. त्यामुळे आधीचे तीस बेड आणि नव्याने वीस बेड उपलब्ध होणार आहेत. पन्नास बेडमुळे अधिकाधिक रुग्णांना मोफत रुग्णसेवा मिळणार आहे.

ड्युरा ऑक्सिजन प्रकल्प येथे मंजूर

ड्युरा ऑक्सिजन प्रकल्प येथे कार्यान्वित करावा, अशी मागणी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने केली होती. ती मंजूर झाल्याने आता ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. ग्रामीण रुग्णालयात रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना करण्यात आल्या.

Web Title: If the situation becomes serious, stop the laxity in the health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.