...तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 11:49 AM2022-11-05T11:49:15+5:302022-11-05T11:50:10+5:30

Gulabrao Patil : आमचे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे. 

... If the NCP would have gone with the BJP, Gulabrao Patil reaction on ncp and bjp alliance | ...तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट!

...तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट!

googlenewsNext

- प्रशांत भदाणे

जळगाव : शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या विषयावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशन संपलाय पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे सांगितले जात आहे. मात्र, आमचे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती, सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती, असा टोला गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. शहाजी बापू पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. तसेच, शिंदे सरकारने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोटही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, पक्ष सोडणे गैर नाही, परंतु ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली. त्यासोबत गद्दारी करणं चुकीचा आहे, असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. यावर अजित पवारांना गुलाबराव पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे, आम्ही मूळ शिवसेना आहोत, बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे, आम्ही भाजपमध्ये गेलो का, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्यापद्धतीने आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळाले आहे. आम्ही पक्षांतर केलेले नाही, जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचे वक्तव्य असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले.

शिर्डीत राष्ट्रवादीचे दोन दिवसीय चिंतन शिबीर सुरू आहे. या शिबीराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिर्डीत आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत केले होते. दरम्यान, काँग्रेसचे अधिवेशन झाल्यानंतर शिवसेना फुटली. हा आमच्या गावचा पायगुण आहे. आता राष्ट्रवादीचे अधिवेशन झाल्यावर राष्ट्रवादी फुटेल, असा दावा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला होता. हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

Web Title: ... If the NCP would have gone with the BJP, Gulabrao Patil reaction on ncp and bjp alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.