बनावट अपंगत्व असल्यास थेट फौजदारी
By admin | Published: June 18, 2017 01:16 PM2017-06-18T13:16:27+5:302017-06-18T13:19:05+5:30
जळगाव जि.प. सीईओंचे आदेशामुळे कर्मचा:यांमध्ये खळबळ
Next
>बनावट अपंगत्व असल्यास थेट फौजदारी
जळगाव जि.प. सीईओंचे आदेशामुळे कर्मचा:यांमध्ये खळबळ
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.18 : जळगाव जिल्हा परिषदेतील सर्व अपंग कर्मचा:यांची मुंबई येथून पुन्हा फेरतपासणी करावी. प्रमाणपत्र मध्ये तफावत आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व विभागाना दिले आहेत.
बदली प्रक्रियेपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षक , ग्रामसेवक आणि विविध विभागातील कर्मचा:यांनी बनावट अपंगांचे दाखले जोडून सवलती मिळविल्या आहेत. त्यामुळे ख:या अपंगांवर आणि इतर कर्मचा:यांवर अन्याय झाला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यात. मात्र वैद्यकीय दाखले ग्राह्य धरून दुर्लक्ष करण्यात आले. वैद्यकीय दाखल्यांबाबतही तक्रारी झाल्यात त्यानंतर सर्व अपंग कर्मचा:यांची धुळे येथील वैद्यकीय बोर्डाकडून पडताळणीचे आदेश दिले होते. मात्र त्यातही गैरप्रकार झाल्याची तक्रार अपंग कर्मचारी संघटनेकडून झाली होती. शासनाकडून देण्यात येणा:या अपंग भाडे सवलती, अपंग भत्ता, आदींचा फायदा घेत शासनाला लुबाडले जात होते. अत्याधुनिक औषधी यंत्रणा उपलब्ध असताना अपंगांची संख्या वाढली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संघटनेच्या तक्रारीची दाखल घेत 12 जून रोजी फेर तपासणीचे आदेश निर्गमित केले आहेत.
ख:या अपंगांना न्याय मिळेल : पाटील
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतलेला निर्णय धाडसी आहे. अनेकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर पदोन्नती घेतली आहे. मात्र या पडताळणीतून ख:या अपंगाना न्याय मिळणार आहे. प्रशासनाने मात्र पाठपुरावा कायम ठेवण्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघाचे राज्य कोषाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली.