शिक्षक भरतीवेळी कुणबी प्रमाणपत्र असल्यास ‘ओबीसी’चा फायदा

By अमित महाबळ | Published: November 19, 2023 02:57 PM2023-11-19T14:57:06+5:302023-11-19T14:58:19+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या फैजपूर येथे होत असलेल्या राज्य अधिवेशनासाठी केसरकर जळगावला आले होते.

if there is a kunbi certificate at the time of teacher recruitment the benefit of obc said deepak kesarkar | शिक्षक भरतीवेळी कुणबी प्रमाणपत्र असल्यास ‘ओबीसी’चा फायदा

शिक्षक भरतीवेळी कुणबी प्रमाणपत्र असल्यास ‘ओबीसी’चा फायदा

अमित महाबळ, जळगाव : राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना ओबीसीचा फायदा मिळेल. शिक्षकांची कमरता असल्याने शाळांवर जो परिणाम झाला आहे, तो गृहित धरता लवकरात लवकर भरती होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते रविवारी, सकाळी जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामृहात माध्यमांशी बोलत होते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या फैजपूर येथे होत असलेल्या राज्य अधिवेशनासाठी केसरकर जळगावला आले होते.

शिक्षकांची भरती प्रक्रिया व दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी यामुळे भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले, की भरती प्रक्रिया करत असताना अनेक ठिकाणी आरक्षित जागा या खुल्या प्रवर्गात टाकल्यामुळे खुल्या जागांची संख्या कमी झाली होती. आम्ही प्रयत्नपूर्वक या सर्वांची पाहणी करून खुल्या जागा वाढविल्या आहेत. याबाबत मराठा समाजाच्या संघटनांची देखील मागणी होती. यामुळे खुल्या प्रवर्गात पुरेशा जागा उपलब्ध झाल्या आहेत. ईडब्लूएस आरक्षणाचा फायदा या भरतीमध्ये मिळेल. तसेच मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. जे खुल्या प्रवर्गात आहेत, त्यांना त्यातून संधी आहेच मात्र, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळू शकेल, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.
 
टप्पा अनुदान; लक्ष घालण्याची सूचना

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित उपस्थित होते. प्रसाद यांनी पुण्याला असताना शिक्षणाच्या संदर्भात खूप चांगले काम केले. त्याच पद्धतीचे काम विशेषतः भाषा व गणिताच्या बाबतीत, जळगाव जिल्ह्यात केले आहे. त्याचा चांगला परिणाम शालेय शिक्षणात आढळून आला आहे. टप्पा अनुदानाच्या शाळांच्या संदर्भात अधिक लक्ष घालण्याची सूचना केली आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Web Title: if there is a kunbi certificate at the time of teacher recruitment the benefit of obc said deepak kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.