पिंजरा गाडी राहिली नसती तर आम्ही वाचलो नसतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 PM2021-02-25T16:35:00+5:302021-02-25T16:36:43+5:30

देवझिरी वनक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला हा सागवान तस्करांनी केला असल्याचे वनविभागाच्या पथकाने सांगितले.

If there was no cage left, we would not have survived ... | पिंजरा गाडी राहिली नसती तर आम्ही वाचलो नसतो...

पिंजरा गाडी राहिली नसती तर आम्ही वाचलो नसतो...

Next
ठळक मुद्देदेवझिरी येथील हमला सागवान तस्करांकडूनच झाल्याचा वनविभागाचा दावा.अधिकाऱ्यांनी दिल्या घटनास्थळी भेट.

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : देवझिरी वनक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला हा सागवान तस्करांनी केला असल्याचे वनविभागाच्या पथकाने सांगितले. जर शासकीय वाहन हे पिंजरा गाडीच्या संरक्षणामुळे कर्मचाऱ्यांचे जीव वाचले, अशी आपबिती हल्ल्यातील जखमींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सातपुड्यातील जंगल सुरक्षित रहावे, यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवून सागवान तस्करांच्या मनसुब्यावर पाणी फिरले म्हणून त्यांनी सुनियोजित पद्धतीने कट रचून हा हमला केला. त्यात सहा वनकर्मचारी व चार राज्य राखीव दलाचे जवान यांना जखमी करीत उभ्या सागवान वृक्षांची कत्तल केली.

पिंजरा गाडीने वाचविले प्राण

रात्री साडेबाराच्या ते दोन वाजेच्या दरम्यान तस्करांनी लाकूडतोड सुरू करताच गस्ती पथकाने त्यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी ३० ते ३५ तस्कर वनकर्मचारी व राज्य राखीव दलाच्या जवानांवर गोफणीने तुफान दगडांचा मारा सुरू केला. हल्ला इतका जोरदार होता की राज्य राखीव दलाचे जवानाच्या हेल्मेटची जाळी तुटून मानेला दगड लागला अनेकजण जायबंदी होत असताना शासकीय वाहनात सर्वजण जीव मुठीत घेऊन बसले, त्या वाहनावरसुद्धा त्यांनी दगडाचा मारा केला. जर त्या गाडीच्या खिडक्यांना तारेच्या पक्क्या जाळ्यांनी ते दगड आत येऊ शकले नाही. शेवटी स्व-संरक्षणासाठी जवानांनी हवेत दोन फैरी झाडल्या, तेव्हा कुठे तस्कर पांगले. जर ही पिंजरा गाडी नसती तर आमचे प्राण वाचले नसते, अशी प्रतिक्रिया जखमी वनपाल पी. बी. महाजन यांनी दिली.

याबाबत आडवद पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोकुळ बयास हे करीत आहेत.याबाबत आडवद पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोकुळ बयास हे करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोपटली पाठ

२४ रोजी उपवन संरक्षक धुळे वनवृत्तचे बी. डब्ल्यू. पगारे, उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगावचे एच. एस. पद्मनाभ, सहायक वनसंरक्षक व्ही. एच. पवार, वनक्षेत्रपाल एस. एम. सोनवणे यांनी घटनास्थळी पाहणी करून र्मचाऱ्यांनी जंगल वाचविण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावल्याबद्दल कौतुक केले.

५० हजारांचे सागवान हस्तगत

सागवान तस्करांनी देवझिरी वनविभागाच्या मालकीचे पाटीकेम्प परिसरात, वासूपॉइट ते पाटी कॅम्पचे मध्यभागी देवझिरी जंगलात एकूण २६ सागवान झाडांची कत्तल केली. त्यातील २.५१ घनमीटर पन्नास हजार रुपये किमतीचे सागवान जप्त केले आहे.

Web Title: If there was no cage left, we would not have survived ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.