‘ट्राय’ने दरवाढ मागे न घेतल्यास जळगावातील केबलसेवा बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 04:53 PM2018-12-21T16:53:39+5:302018-12-21T16:58:55+5:30

‘ट्राय’ने व सरकारने नवीन कायद्यानुसार केबलच्या ग्राहकांना प्रती चॅनलच्या दरात तब्बल पाच पट वाढ केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा केबल चालक-मालक संघटनेतर्फे गुरूवार, २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

If TRAI does not follow the increase, then stop the service in Jalgaon | ‘ट्राय’ने दरवाढ मागे न घेतल्यास जळगावातील केबलसेवा बंद करू

‘ट्राय’ने दरवाढ मागे न घेतल्यास जळगावातील केबलसेवा बंद करू

Next
ठळक मुद्देकेबल चालक संघटनेचा इशाराजळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाघोषणांनी दणाणला परिसर

जळगाव : ‘ट्राय’ने व सरकारने नवीन कायद्यानुसार केबलच्या ग्राहकांना प्रती चॅनलच्या दरात तब्बल पाच पट वाढ केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा केबल चालक-मालक संघटनेतर्फे गुरूवार, २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारने व ट्रायने दरवाढ मागे न घेतल्यास केबलसेवा बंद करण्याचा ईशारा दिला.
सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शिवतीर्थ मैदानापासून मोर्चास प्रारंभ झाला. संघटनेचे अध्यक्ष विजय चंदेले यांच्यासह पदाधिकारी व केबल चालक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चा अडविण्यात आला. त्यामुळे शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंदेले यांच्यासह उपाध्यक्ष रमेश राजपूत, सचिव अरविंद नवाल, सहसचिव राजेंद्र बोराखेडे, कैलास व्यवहारे, अजय घेंगट, रईस कुरेशी, तौसिफ शेख, अमरसिंग रानवे, प्रवीण पाटील, नाजीम कुरैशी, मुबीन खान, आरीफ खान, दीपक फालक, अनिल वाणी, दिनेश टाक, महेश साळी, गजानन पाटील, मुकेश देशमुख, विजय कासट, नीलेश भांडारकर, किशोर परदेशी, संतोष तायडे आदींच्या सह्या आहेत.
केबल ग्राहकाला सध्या २०० ते ३०० रूपयात हवे ते चॅनल पाहता येत असताना नवीन कायद्यामुळे त्यासाठी ८०० ते १००० रूपये लागणार आहेत. जे पॅकेज पूर्वी ५ ते ७ रूपयांत मिळत होते, ते आता ६० ते ८० रूपयांत मिळेल. अचानक एवढी चॅनलची दरवाढ करण्याचे कारण काय? सरकाने चॅनलचे रेट जुन्या रेटप्रमाणेच ठेवावे, अशी केबलचालकांची मागणी आहे. सरकार व ट्राय बॉडकास्टरच्या सोबत उभी असल्याचे यातून दिसून येत असल्याचा आरोपही केबलचालकांनी केला आहे. ब्रॉडकास्टरला जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असताना त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. तरीही ट्राय त्यांनाच मदत करीत आहे. ट्रायने हा निर्णय मागे न घेतल्यास केबल चालक मोठे आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला.

Web Title: If TRAI does not follow the increase, then stop the service in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव