जळगाव जिल्ह्यात वर्गणीसाठी सक्ती केल्यास दरोड्याचा गुन्हा दाखल करू : प्रशांत बच्छाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:07 PM2018-09-13T22:07:50+5:302018-09-13T22:19:42+5:30
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून किंवा घरोघरी जाऊन जबरीने वर्गणी वसुल करू नये. याबाबत तक्रार आल्यास संबधितांवर दरोडा व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पारोळा येथील शांतता समितीच्या बैठकीत दिला.
पारोळा : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून किंवा घरोघरी जाऊन जबरीने वर्गणी वसुल करू नये. याबाबत तक्रार आल्यास संबधितांवर दरोडा व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पारोळा येथील शांतता समितीच्या बैठकीत दिला.
तहसील कार्यालयात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे-निंबाळकर होते. या वेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, पोलीस उपविभागीय अधिकारी रफिक शेख, तहसीलदार प्रशांत पाटील ,अर्चना खेतमाळीस,आदी जण उपस्थित होते. गणेश मंडळांनी शेतकºयांच्या आत्महत्या कशा थांबतील. बेटी पढाव बेटी बचाव, मतदार यादीत नावे तपासणी, लसीकरण मोहीम, दारू बंदी या सारखे सजीव आरास सादर करून राष्ट्रीय जनजागृती करावी असे आहवान जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी गणेश मंडळ च्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून घरोघरी जाऊन जबरीने देणगी वसूल करू नये. तक्रार आल्यास दरोडा, लूट करणे असा गंबीर गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी या वर्षाचा गणेशोत्सव डॉल्बी व डी.जे.मुक्त साजरा करण्याचे आवाहन केले.