यशप्राप्तीसाठी सकारात्मक ध्येयाचा शोध घेतल्यास निश्चितच मार्ग सापडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:02 PM2018-08-03T16:02:10+5:302018-08-03T16:02:42+5:30

चाळीसगाव : रजनी पाटील यांनी दिला ‘आयएम पॉझिटिव्ह’चा संदेश

If you are looking for a positive goal for success then you will definitely find the path | यशप्राप्तीसाठी सकारात्मक ध्येयाचा शोध घेतल्यास निश्चितच मार्ग सापडेल

यशप्राप्तीसाठी सकारात्मक ध्येयाचा शोध घेतल्यास निश्चितच मार्ग सापडेल

Next


चाळीसगाव, जि.जळगाव : ‘आयएम पॉझिटिव्ह चाळीसगावकर’ ग्रुपतर्फे आयोजित चाळीसगाव महाविद्यालय व य.ना.चव्हाण महाविद्यालयात ‘चला दोस्तहो, आयुष्यावर बोलू काही’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पालक आणि शिक्षकांप्रती असलेल्या संवादाची अनास्था व मनावरील होत असलेले अनियंत्रित संतुलन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यशप्राप्तीसाठी सकारात्मक ध्येयाचा शोध घेतल्यास निश्चितच मार्ग सापडेल, असे व्याख्यात्या प्रा.डॉ.रजनी पाटील यांनी सांगितले.
या वेळी चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, स्त्रीरोग संघटनाच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे, स्वयंदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, प्राचार्य एस.आर. जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
क्षणभंगुर सुखामुळे आजचा विद्यार्थी जीवनाच्या खऱ्या आनंदास मुकला आहे. समाजरचना समजून घेताना स्वत:त बदल व्हायला हवा. आपल्यातील चांगले-वाईट ओळखण्याचा अधिकार आपलाच असून, स्वत:चे मित्र बनण्याचे शिकायला हवे. यासोबतच दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन, वॉरेन बफेट, भारतरत्न सचिन तेंडुलकर, संगणकाचा महाद्वेत्ता बिल गेटस अशा अनेक महान व्यक्तींचे दाखले लक्षात घेता त्यांचे यश आपणास दिसते. परंतु त्यामागील त्यांचा संघर्ष लक्षात घ्यायला हवा. ‘जिंदगी जिना आसान नही होता, बिना संघर्ष कोई महान नही होता’ यानुसार जीवनाच्या अखेरपर्यंत संघषार्चा सामना हसतमुखाने केल्यास यशदायी फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत मनाचा मोठेपणा बाळगून येणाºया संकटाचा सामना मी लिलया करेल, असा आत्मविश्वास बाळगायला हवा, असे व्याख्यात्या प्रा.डॉ.रजनी पाटील यांनी हितगुजातून विद्यार्थ्याशी संवाद साधला.
‘आयएम पॉझिटिव्ह’, ‘आपण चाळीसगावकर’ ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वत:विषयक सतावणारी भीती, परीक्षेतील अपयश, मानसिक संतुलन, नैराश्य याबाबत १८००८४३४३५३ हेल्पलाईनद्वारे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. ही संपूर्ण माहिती गोपनीय स्वरुपात ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
सूत्रसंचालन चाळीसगाव महाविद्यालयाचे प्रा.रवींद्र पाटील, य.ना.चव्हाण महाविद्यालयाचे प्रा.अरुण पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा.ए.एस.महाजन, संजय पवार यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी ‘आय एम पॉझिटिव्ह’,‘आपण चाळीसगावकर या ग्रुपचे सचिन पवार, संजय पवार, दिलीप घोरपडे, अर्जुन परदेशी, शरद पाटील, समकित छाजेड, स्वप्नील कोतकर, अजय जोशी, स्वप्नील धामणे, योगेश पाटील, देवेन पाटील, राजेंद्र छाजेड, प्रकाश कुलकर्णी, रमेश पोतदार, प्रा. अनिल बागड आदी पदाधिकाºयांनी परिश्रम घेतलेत.

Web Title: If you are looking for a positive goal for success then you will definitely find the path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.