सत्तेवर आल्यास भुसावळसाठी डबल डेकर बस - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:31 PM2019-04-16T17:31:13+5:302019-04-16T17:31:57+5:30
भुसावळ येथे जाहीर सभा: हतनूरमधील गाळ काढून विकास
भुसावळ : देशात पैशांची कमी नाही, मात्र केवळ योग्य नेतृत्वाची कमी होती. चुकीचे नियोजन होते यामुळे देशातील विकास भरकटला होता, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. केंद्रात पुन्हा सरकार आल्यानंतर जळगाव-भुसावळसाठी हवेत उडणारी डबल डेकर बस सुरू करण्यात येईल व हतनूर प्रकल्पातील गाळ काढून या परिसराचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी भुसावळातील संतोषीमाता सभागृहात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, उमेदवार रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार दिलीप भोळे, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नगराध्यक्ष रमण भोळे, पुरूषोत्तम नारखेडे, सुधाकर जावळे, सुरेश धनके, शिवसेना तालुकाध्यक्ष समाधान महाजन, जामनेरचे गोविंद अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खेवलकर, डॉ.मिलिंद वायकोळे, जि.प.सदस्या पल्लवी सावकारे, सरला कोळी, मनोज बियाणी, पूनम बºहाटे, हर्षल पाटील उपस्थित होते.
सभा सुरू होण्याची वेळ दुपारी १२ वाजेची होती. मात्र गडकरी यांचे सभास्थळी २.४५ वाजता आगमन झाले. सभा सुरू होण्यापूर्वी पथनाट्य व जादूचे प्रयोग सादर करण्यात आले. उमेदवार रक्षा खडसे, मकासरे, आमदार जावळे, आमदार संचेती यांनी मनोगत व्यक्त केले.