षडयंत्र वाटते तर सेवा द्या, तुमचे स्वागत आहेलोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:32 PM2020-08-01T12:32:46+5:302020-08-01T12:32:59+5:30

जळगाव : कोरोना हे षडयंत्र असून मुद्दामहून रुग्ण पॉझिटीव्ह आणल्या जात असल्याच्या अफवा पसरविल्या जात असून असे षडयंत्र कोणाला ...

If you think there is a conspiracy, give service, welcome to Lokmat News Network | षडयंत्र वाटते तर सेवा द्या, तुमचे स्वागत आहेलोकमत न्यूज नेटवर्क

षडयंत्र वाटते तर सेवा द्या, तुमचे स्वागत आहेलोकमत न्यूज नेटवर्क

googlenewsNext

जळगाव : कोरोना हे षडयंत्र असून मुद्दामहून रुग्ण पॉझिटीव्ह आणल्या जात असल्याच्या अफवा पसरविल्या जात असून असे षडयंत्र कोणाला वाटत असेल तर त्यांनी डेडिकेटेड रुग्णालयात यावे, परिस्थिती बघावी व सेवा द्यावी, आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अफवा पसरविणाऱ्यांना लगावला आहे़ प्रत्येक कोरोना रुग्ण हा प्रशासनाचा ताण वाढविणारा आहे, त्यामुळे प्रत्येक रुग्णामागे एक ते दीड लाख रूपये मिळतात, असा कुठलाही प्रकार नसल्याचे त्यांनी शुक्रवारी फेसबूक लाईव्हमध्ये दिले़
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाच्या उपाययोजना मांडत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली़ वारंवार लॉकडाऊन हा उपाय नसून स्वयंशिस्तीने आपण कोरोनाला हरवू शकतो, असे जिल्हाधिकारी त्यांनी सांगितले़

-कोविड रुग्णालयात ५५ बेडचे अतिदक्षता विभाग
-आणखी तीस बेडच्या अतिदक्षता विभागाचे कोविड रुग्णालयात तर डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात ६० बेडचे नियोजन
-जिल्ह्यात ६०० आॅक्सिजन युक्त बेड
- तालुक्याच्या व्यक्तिला तालुक्यातच आॅक्सिजन
-१५ सप्टेंबरपर्यंतच्या परिस्थितीपर्यंत प्रशासन सज्ज
-कोरोनाला कमी लेखू
-रुग्णालयांना अचानक भेटींचे प्रमाण वाढविणार

नागरिकांचे मुद्दे
गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत
१५ दिवसांचा पुन्हा कडक लॉकडाऊन करा
महापालिकेवर अधिक नियंत्रण हवे
नॉन कोविड रुग्णांसाठी व्यवस्था काय?
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सुविधा हव्या
औषधी उपलब्ध करून द्या, खासगी रुग्णालयांच्या बिलांवर नियंत्रण ठेवा अशा अनेक समस्या नागरिकांनी या फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडल्या अनेकांनी चांगले सल्लेही दिले आहे़

Web Title: If you think there is a conspiracy, give service, welcome to Lokmat News Network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.