विनाकारण प्रवास केला तर होणार दहा हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:15 AM2021-04-24T04:15:48+5:302021-04-24T04:15:48+5:30

जळगाव : ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवांसाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी प्रवास ...

If you travel without any reason, you will be fined ten thousand | विनाकारण प्रवास केला तर होणार दहा हजाराचा दंड

विनाकारण प्रवास केला तर होणार दहा हजाराचा दंड

Next

जळगाव : ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवांसाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी प्रवास देण्यात येणान नाही. विनाकारण प्रवास केल्यास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच तपासणीसाठी जिल्हाभरात पथके नियुक्त करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

ब्रेक द चेन संदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून अंमलात येणार आहे आहे. ती १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवा ही वैद्यकीय उपचार, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अथवा जीवनावश्यक सेवा पुरवणे यासाठीच मर्यादित आहे. या कारणांसाठी करावयाच्या प्रवाशाला कुठल्याही पासची आवश्यकता नाही असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.

Web Title: If you travel without any reason, you will be fined ten thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.