विनाकारण बाहेर फिराल तर कारवाईस पात्र ठराल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:54+5:302021-04-16T04:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यापाठोपाठ जिल्हा प्रशासनानेदेखील जिल्ह्यात आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यापाठोपाठ जिल्हा प्रशासनानेदेखील जिल्ह्यात आदेश लागू केले आहेत. मात्र आदेशातील अनेक बाबींमुळे प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक यांचा मोठा गोंधळ होत होता. आता सर्वत्र नागरिकांना संचारबंदी असली तरी अत्यावश्यक बाबींसाठीच नागरिकांना घराबाहेर पडायचे आहेत. त्याशिवाय बाहेर फिरताना दिसल्यास कारवाई होईल. सर्व कार्यालये बंद ठेवण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना घरूनच काम देण्याचे आदेश आहेत.
काय आहे सुरू
हॉस्पिटल, दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग सेंटर, औषध विक्रेते, इतर वैद्यकीय सुविधा, मेडिकल इन्शुरन्स कार्यालये, मास्क व सॅनिटायजर उत्पादक
पशुवैद्यकीय सेवा, दवाखाने, मटन, मासे, पशुखाद्य विक्री दुकाने इतर पशू संबधित सुविधा.
किराणा दुकाने, भाजी दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने,
शीतगृहे, वेअर हाउसिंग सेवा, रेल्वे, टॅक्सी, विमान, ऑटो व सार्वजनिक बससेवा
मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा.
कृषी सेवा, शेतीची कामे, खते, बी-बियाणे, शेती उपकरणांची दुरुस्ती
ई कॉमर्स (केवळ अत्यावश्यक सेवा पुरविण्याकरिता)
पेट्रोलपंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन
इलेक्ट्रिक व गॅसपुरवठा सेवा
एटीएम संबंधित सेवा
गॅरेज.
अत्यावश्यक सेवेशी संबंधित कारखाने, कंपन्या
निर्यात करणारे आस्थापना/ कंपन्या/ घटक
हॉटेल्सची होम डिलिव्हरी सुविधा सकाळी ७ ते रात्री ८ वाजता
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था - रिक्षात चालक आणि दोन प्रवासी, तर टॅक्सीत चालक व निर्धारित क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी
लग्नसमारंभ २५ लोकांच्या उपस्थितीत
बांधकामे (कामगारांच्या राहण्याची सुविधा असेल तरच)
काय आहे बंद
सर्व खासगी कार्यालये
सर्व आठवडे बाजार
रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स (अपवाद जे रहिवासी हॉटेल)
अत्यावश्यक सेवेत नसलेले, निर्यात बंधन नसलेले कारखाने
मनोरंजन, करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स
सिनेमा हॉल, नाट्यगृह, सभागृहे, व्हिडियो गेम पार्लर
वॉटर पार्क, जलतरण तलाव, जीम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स क्लब,
धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे (नियमित पूजा करणाऱ्यांसाठीच खुली)
सलून, स्पा, ब्यूटिपार्लर
शाळा व महाविद्यालये
कोचिंग क्लासेस
धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम.