आयजी पथकाची तिसऱ्यांदा धाड; अमळनेरमध्ये सट्टा खेळताना २८ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 23:33 IST2021-01-06T23:32:56+5:302021-01-06T23:33:06+5:30
साडे तीन लाखाची रोख रक्कम व दोन मोटरसायकली जप्त

आयजी पथकाची तिसऱ्यांदा धाड; अमळनेरमध्ये सट्टा खेळताना २८ जणांना अटक
जळगाव: स्थानिक पोलीस अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवू न शकल्याने आयजी पथकाने पुन्हा शहरात चार ठिकाणी छापे मारुन सट्टा जुगार खेळताना २८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडे तीन लाखाची रोख रक्कम व दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बुधवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. ती सायंकाळपर्यंत सुरु होती.
काही दिवसांपूर्वी आयजींच्या पथकाने शहरातील अवैध धंद्यावर दोन वेळा छापे टाकले होते. आता हा तिसरा छापा होता. सपोनि संदीप पाटील, सपोनि सचिन जाधव, उमाकांत खापरे, नितीन सपकाळे , राजेंद्र सोनवणे, सुरेश टांगोरे, विश्वेश हजारे,नारायण लोहरे ,केतन पाटील यांच्या पथकाने वेषांतर करत हे छापे टाकले. महात्मा गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्स, सानेगुरुजी शॉपिंग कॉम्प्लेक्स, लुल्ला मार्केट आणि गांधीनगर भागात ही धडक कारवाई करण्यात आली.