फायर ऑडीटबाबत अनभिज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 10:37 PM2021-01-09T22:37:55+5:302021-01-09T22:38:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : भंडारा येथील नवजात शिशू कक्षात आग लागून १०शिशूंचा जीव गेला. यानंतर पूर्ण राज्यभरातील दवाखान्यांमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : भंडारा येथील नवजात शिशू कक्षात आग लागून १०शिशूंचा जीव गेला. यानंतर पूर्ण राज्यभरातील दवाखान्यांमधील आगीबाबतच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आगीची घटना घडल्यास तातडीने उपाययोजना करत्या याव्यात म्हणून रुग्णालयांमध्येही फायर ऑडीट करण्याचे निर्देश असतात. याचे पालन होते की नाही, हे पाहिले असता भुसावळ विभागातील बहुतांश शासकीय रुग्णालयांमधील अधिकारी हे तर फायर ऑडीटबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
बोदवडला केला अंदाज व्यक्त
बोदवड ग्रामीण रुग्णालयाच्या फायर ऑडीट बाबत वैद्यकीय अधिकारी अमोल पवार यांची प्रतिक्रिया घेतली असता नव्यानेच चार्ज घेतला असून मार्च महिन्यात कदाचित ऑडीट झाले असेल असे त्यांनी सांगितले.
यावल येथे आदेश नाहीत ....
यावल ग्रामीण रुग्नालयास फायर ऑडीट विषयी शासनाकडून कोणत्याही सुचना नसल्याने ऑडीट होत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी सांगीतले.
भुसावळला माहितीच उपलब्ध नाही
भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरला फायर ऑडीट बाबत माहितीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी यांच्याशी संपर्क केला असता याबाबतची माहिती येथे उपलब्ध नसून ती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तर नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर यांना कोरोना झाल्याने माहिती मिळाली नाही.