महामार्गाच्या तपासणी अहवालाकडे डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:09+5:302021-01-14T04:14:09+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २७ जुलै २०१८ रोजी तपासणी करून अहवाल सादर केला आहे. त्यात शहराच्या स्थानिक गरजा, प्रत्यक्ष जागेवरील ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २७ जुलै २०१८ रोजी तपासणी करून अहवाल सादर केला आहे. त्यात शहराच्या स्थानिक गरजा, प्रत्यक्ष जागेवरील आवश्यकता, सुरक्षा, समांतर रस्ता, सध्या वापरात व अस्तित्वात असलेले रोड ड्रेनेज, रुंदी, अंडरपास व फूट ओव्हरब्रीज यांचा अंतर्भाव असावा, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. रस्ता तयार करून किंवा महामार्गाबाहेरुन काढल्यानंतर समस्या सुटणार नाही. अस्तित्वातील ६० मीटर संपूर्ण रुंदीचा महामार्ग पूर्णपणे विकसित करावा. हा महामार्ग विकसित न झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुभाजकासह दोन्ही बाजूला ७.५ मीटर रस्ते तयार करुन (चार लेन) दोन्ही बाजूला ५.५ मीटरचे समांतर रस्ते व फूटपाथची आवश्यकता आहे. जेथे उड्डाणपूल, चौक सुधारणा, पादचारी व वाहनांसाठी अंडरपास तयार करावे, अजिंठा चौक इच्छा देवी यांना विशिष्ट पध्दतीने तयार करण्याची सूचना अहवालात आहे. मात्र, या अहवालाकडे डोळेझाक केली जात असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे फारुक शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे.