इकरा थीम महाविद्यालयाला नॅकची ‘बी प्लस’ श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 06:42 PM2019-07-18T18:42:26+5:302019-07-18T18:44:12+5:30
जळगाव - शहरातील इकरा शिक्षण संस्थाद्वारा संचलित एच.जे.थीम वरिष्ठ महाविद्यालयास बैंगलोर येथील नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रीडेशन कौसिल या संस्थेच्या ...
जळगाव- शहरातील इकरा शिक्षण संस्थाद्वारा संचलित एच.जे.थीम वरिष्ठ महाविद्यालयास बैंगलोर येथील नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रीडेशन कौसिल या संस्थेच्या राष्ट्रीय स्तराच्या पथकाने नॅक मूल्यांकनासाठी नुकतीच भेट दिली होती. या समितीने केलेल्या मूल्यांकनात महाविद्यालयास ‘बी प्लस’ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तराच्या पथकामध्ये मदुराई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ व्ही़मुरगेसन, इंदोरमधील अहिल्या विश्व विद्यायाच्या आयटी विभागाच्या प्रमुख डॉ़ वृंदा टोकेकर, मडगाव येथील चौगुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ नंदकुमार सावंत यांचा समावेश होता. या समितीकडून काही महिन्यांपूर्वीच महाविद्यालयास भेट देऊन एऩएस़एस व क्रीडा तसेच विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेऊन परिक्षण केले होते. त्यानंतर मॅनेजमेंट, विभागप्रमुख, पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सभा घेऊन महाविद्यालयाच्या पुढील प्रगतीबद्दल सविस्तर चर्चा केली होती.
मुस्लिम विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची टक्केवारी वाढली
नॅकची श्रेणी प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयता एक्झिट बैठक झाली़ त्यामध्ये प्रा. व्ही़ मुरगेसन यांनी महाविद्यालय फक्त अल्पसंख्यांक नाही तर इतर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत राष्ट्रीय एकात्मतेचे उत्कृष्ट काम करित आहे, असे मत व्यक्त केले. सोबत जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम विद्यार्थिनींची उच्च शिक्षण घेण्याची टक्केवादी सुध्दा वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.
या बैकीला संस्थाध्यक्ष डॉ़ करिम सालार, डॉ़ अंजली कुलकर्णी, हाजी गफफार मलिक, इकबाल शाह, प्राचार्य डॉ. सैय्यद शुजाअत आदींची उपस्थिती होती़ तसेच नॅकच्या यशाकरिता या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.