अवैध ळ कनेक्शन, ७४ हजारचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 07:01 PM2021-02-06T19:01:43+5:302021-02-06T19:02:07+5:30
अमळनेर नगरपरिषदेच्या पथकाने ६ अवैध नळ कनेक्शन पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीतील निर्देशानुसार अमळनेर नगरपरिषदेच्या पथकाने ६ अवैध नळ कनेक्शन पकडून त्यांच्याकडून ७४ हजार रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे.
मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या आदेशान्वये अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील अवैध नळ जोडणीधारक, घरपट्टी, नळपट्टी तसेच व्यावसायिक मालमत्ता थकबाकीदार यांच्यावर कारवाइ करणे सुरू आहे. शनिवार, रविवारीदेखील कार्यालय सुरू असून वसुलीचे काम करण्यात येत आहेत. वामन नगर, गायत्री नगर, तलाठी कॉलनीमधील महेश भटू पाटील, लोटन चिंचोरे, पंकज महारू शिसोदे यासह इतरांचे असे ६ नळ कनेक्शन बंद केले आहेत.
त्यांच्याकडून मालमत्ता वसुली ७.४० हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. पथकात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, वसुली विभागाचे शेखर देशमुख, जगदीश चौधरी, सतीश देशमुख, सोमनाथ वंजारी, कमरोद्दीन शेख यांचा समावेश होता.