कठोरा परिसरातून वाळूचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:38+5:302021-02-24T04:17:38+5:30

जळगाव - तालुक्यातील कठोरा, किनोद, सावखेडा या गावालगत असलेल्या तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरु आहे. ...

Illegal extraction of sand from harsh areas | कठोरा परिसरातून वाळूचा अवैध उपसा

कठोरा परिसरातून वाळूचा अवैध उपसा

Next

जळगाव - तालुक्यातील कठोरा, किनोद, सावखेडा या गावालगत असलेल्या तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरु आहे. मंगळवारी कठोरा येथील ग्रामस्थांनी अनधिकृत उपसा करणारे ट्रॅक्टर पकडले होते. याबाबत प्रशासनाला कळवून देखील प्रशासनातील एकही अधिकारी हजर न झाल्याने ग्रामस्थांना नाईलाजास्तव हे ट्रॅक्टर सोडावे लागले. ग्रामस्थांकडून कारवाई होत असतानाही प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने आता यापुढे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केल्यास त्यास प्रशासनच जबाबदार राहिल असा इशारा कठोरा येथील शेतकरी डॉ.सत्वशिल जाधव यांनी दिला आहे.

महामार्गाच्या कामासाठी शेतातून काढली माती

जळगाव -शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गाच्या बायपासचे काम आव्हाणे शिवारात सुरु आहे. मात्र, हे काम सुरु असताना मक्तेदाराकडून आजूबाजुच्या शेतीतून माती काढली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच ही माती काढत असताना गहू, हरभरा पीकांचे देखील नुकसान झाले आहे. रवींद्र तोताराम चौधरी यांच्या शेतातुन देखील मोठ्या प्रमाणात माती काढल्याने पीकाचेही नुकसान झाले असल्याने नुकसानभरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जलसंवर्धनासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा

जळगाव - केंद्र शासनाने जलसंवर्धनासाठी जलशक्ती अभियान सुरू केले आहे. पावसाचे पाणी वाचविणे काळाची गरज असून त्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. जलशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू युवा केंद्र जळगाव व योगी संस्थेतर्फे वेबिनार आयोजित करण्यात आला होता. वेबिनारमध्ये १०० वर जलप्रेमींनी सहभाग नोंदविला. वेबिनारमध्ये नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, नरेंद्र चुग, ज्ञानेश शिवाजीराव मगर आणि योगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

रब्बी पीकांच्या काढणीस सुरुवात

जळगाव - जिल्ह्यात रब्बी पीकांच्या काढणीस सुरुवात झाली असून, अनेक भागात आता गहू, हरभऱ्याची काढणी सुरु आहे. तर अनेक भागात उशीराने पेरणी झाल्यामुळे अजून पीकांची वाढ पुर्णपणे झालेली नाही. दरम्यान, मका व दादरचे दाणे देखील अद्याप पुर्णपणे भरलेले नसल्याने दादर व मक्याची काढणी एप्रिलपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

Web Title: Illegal extraction of sand from harsh areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.