विनापरवाना ध्वज लावला आठ वाहनचालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:33 PM2019-04-20T12:33:23+5:302019-04-20T12:34:13+5:30

आचारसंहितेचा भंग

Illegal flag is a crime against eight motorists | विनापरवाना ध्वज लावला आठ वाहनचालकांवर गुन्हा

विनापरवाना ध्वज लावला आठ वाहनचालकांवर गुन्हा

Next

जळगाव : भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर पार्कवर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी पक्षाचे झेंडे व मफलर लावण्यात आले होते. याबाबत निवडणूक आयोगाच्या पथकाने विचारणा केली असता विनापरवानगी झेंडे लावलेले आठ वाहने आढळून आली. या आठही वाहनचालकांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सागरपार्कवर मुख्यमंत्र्यांची सभा शुक्रवारी झाली. सभेला काही लोक खासगी वाहनतून आले होते. या वाहनांची निवडणूक विभागातील भरारी पथकातील अधिकारी सचिन दशथराव आयतलवाड यांच्यासह सुरेश पाटील, राजेश भावसार, राजेश विलासराव, गणेश देसले, प्रशांत पाठक या कर्मचाऱ्यांनी सभास्थळी लावण्यात आलेल्या वाहनांची तपासणी केली. त्यावेळी सभास्थळी लावलेल्या आठ ते दहा वाहनांवर पक्षाचे झेंडे व मफलर लावलेले असल्याचे आढळून आले. यावेळी वाहनचालकांकडे परवानगी नसल्याचे आढळून आले. त्याठिकाणी असलेली चार वाहने रामानंद नगर पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.
या वाहनांवर कारवाई
विनापरवानगी प्रचार करणारे मिनीडोअर रिक्षा (क्ऱ एमएच़१९़ जे़ ६७४९), ४०७ (क्ऱ एमएच़१८़ ऐऐ़ १९७८), ४०७ (क्ऱ एमएच़१९़ एस़४१६६), मोटारसायकल (क्ऱ एमएच़१९़ ऐडब्ल्यू ९०७९) तसेच क्ऱ एमएच़५़बीडी़१८६५, क्ऱ. एमएच़१४़डीएक्स़२०६९, क्ऱएमएच़०६़ बीई़२६३७, एमएच़१८़डब्ल्यू़७७८६ या चारचाकीच्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे़
तीन वाहने चालकांनी पळविली
ही वाहने पंचनामा करुन रामानंदनगर पोलिस स्टेशनला जमा करण्यासाठी नेली जात असतांना चालकांनी मोटारसायकल (क्ऱ एमएच़१९़ ऐडब्ल्यू़०९७९), चारचाकी (क्ऱएमएच़०६़ बीई़२६३७),चारचाकी (क्ऱ एमएच़१८़डब्ल्यू़७७८६) ही तीन वाहने पळवून नेली.
त्यांच्याविरुद्ध देखील आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Illegal flag is a crime against eight motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव