अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:46+5:302021-03-21T04:15:46+5:30

जळगाव : शहरातील कंजरवाडा, सिंगापूर, जाखनीनगर, नवल कॉलनी परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर शनिवारी पहाटे ५ वाजता एमआयडीसी पोलिसांनी कारवाईची ...

Illegal liquor dens demolished | अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त

अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त

googlenewsNext

जळगाव : शहरातील कंजरवाडा, सिंगापूर, जाखनीनगर, नवल कॉलनी परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर शनिवारी पहाटे ५ वाजता एमआयडीसी पोलिसांनी कारवाईची केली. यात गावठी हातभट्टी दारू तयार होणाऱ्या भट्ट्यांसह सुमारे ३ लाख ६१ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट केले. याप्रकरणी १० जणांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंगापूर, कंजरवाडा, जाखनीनगर, नवल कॉलनी या परिसरात अवैध गावठी दारूच्या भट्ट्या सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास या भट्ट्यांवर कारवाई केली. यात बिंदिया गणेश बागडे, अनिला सुधाकर बागडे, सरला कुंदन अभंगे, प्रेमाबाई गजमल धमंडे (करंजे), सोनी नितीन नेतलेकर, नैनिता मंंगलकुमार गुमाणे, रंजित धीरज भाट, वनाबाई देवसिंग बाटुंगे, योगेश महेश भाट, बेबीबाई हिरा नेतले (सर्व रा. कंजरावाडा, जाखनीनगर) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील सुमारे ३ लाख ६१ हजार ९५० रुपये किमतीचे कच्चे रसायन व गावठी दारू नष्ट करण्यात आली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांत १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, विशाल वाठोरे, सफौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफफार तडवी, मंदा बैसाणे, राजेंद्र कांडेलकर, विजय नेरकर, अल्ताफ पठाण, निलोफर सय्यद, इम्रान सय्यद, योगेश बारी, सुधीर साबळे, गोविंदा पाटील, इम्रान बेग, सतीश गर्जे, सिद्धेश्‍वर डापकर, सदानंद नाईक यांच्या पथकाने केले.

Web Title: Illegal liquor dens demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.