अवैध मद्यविक्रीचा सुळसुळाट

By admin | Published: April 18, 2017 12:05 AM2017-04-18T00:05:29+5:302017-04-18T00:05:29+5:30

मोलगी, चाळीसगावी कारवाई : तीन लाखांचे मद्य जप्त, सात अटकेत

Illegal liquor liquor trade | अवैध मद्यविक्रीचा सुळसुळाट

अवैध मद्यविक्रीचा सुळसुळाट

Next

नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर दारूबंदी झाल्यानंतर आतील मार्गावर अवैध मद्यविक्रीचा सुळसुळाट झाला आहे. त्यावर होणा:या पोलीस कारवाईतून ही बाब स्पष्ट होत आहे. मोलगीनजीक सोमवारी मद्याची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले, तर चाळीसगाव नजीक  बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत जवळपास तीन लाख रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले तर सात जणांना अटक करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील अकलाड येथे शनिवारी   तालुका पोलिसांनी 23 हजार 260 रुपयांचा दारूसाठा जप्त केला तर शुक्रवारी धुळे  शहरातील  प्रकाश चित्र मंदिराजवळ बंद पानटपरीच्या आडोशाला दारूची चोरटी विक्री करताना आझादनगर (पान 8 वर)
पोलिसांनी दोघांना पकडले होते.त्याआधी महामार्गालगत दारूविक्री बंदी लागू झाल्यानंतर दोनच दिवसात एका हॉटेलातून सात लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला होता.
चाळीसगाव शहरालगत एका शेतात बनावट दारूचा कारखाना पोलिसांनी रविवारी रात्री उद्ध्वस्त केला. यात 1 लाख 11 हजाराची बनावट दारू हस्तगत करण्यात आली आहे. फिरोजखान अहमदखान (वय 30 रा.मालेगाव), नदीमखान शाबीरखान (वय 23) व शाहरुख शेख रफिक शेख (वय 24, दोघे रा. चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली. 
पाटणा देवी फाटा ते कन्नड फाटा या दरम्यान एका शेतात हा कारखाना दोन दिवसापूर्वीच सुरु करण्यात आला होता.

मोलगी येथील पोलीस निरीक्षक                 पी़ज़ेराठोड यांच्या पथकाने भांग्रापाणी फाटय़ावर पहाटे चार वाजता धडगावकडून येणा:या  वाहनातून  (क्र. जीजे 05 एसएल 9350) पावणेदोन लाख रुपयांचे विदेशी बनावटीचे मद्य जप्त केले. वाहनचालक लक्ष्मण शेगजी वसावे (रा़ देवमोगरा) व दु:या सज्या वसावे, किसन रामा वसावे, योगेश कोथा वसावे (सर्व रा़ मोरखीचा तिनसुल्यापाडा़ ता़ अक्कलकुवा) यांना अटक केल्यानंतर  न्यायालयाने या चारही जणांना 21 र्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Illegal liquor liquor trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.