बेकायदा मद्याचा साठा, तिघांना अटक

By admin | Published: April 22, 2017 12:24 AM2017-04-22T00:24:12+5:302017-04-22T00:24:12+5:30

सहाय्यक पोलीस अधीक्षकांची धडक मोहिम : तीन ढाब्यांसह हॉटेलवर कारवाईने खळबळ

Illegal liquor stock, three arrested | बेकायदा मद्याचा साठा, तिघांना अटक

बेकायदा मद्याचा साठा, तिघांना अटक

Next

भुसावळ : बेकायदा मद्याचा साठा करणाºया तिघा हॉटेल्ससह ढाब्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यात देशी-विदेशी असा ३० हजारांचा साठा जप्त करीत तिघांना अटक करण्यात आली.
भुसावळ-जळगाव रस्त्यावरील नशिराबाद टोल नाक्याच्या अलिकडे झालेल्या कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे़ परमीट रूम व वाईन शॉप बंद झाल्यानंतर हॉटेल व ढाबे  चालकांकडून ब्लॅकमध्ये दारू विकली जात असल्याची माहिती मिळाली. छापा टाकून कारवाई करण्यात आली़
पहिली कारवाई हॉटेल रसोईवर करण्यात आली़ पाच हजार ५४८ रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली तर गुणवंत प्रल्हाद कोल्हे (वय २५, असोदा, जळगाव) यास अटक करण्यात आली तर हॉटेल मालक राहुल सुरेश धांडे (जळगाव) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला़
दुसरी कारवाई गारवा ढाब्यावर करण्यात आली़ २० हजार ५० रुपयांची दारू जप्त करण्यात आली तर मुरलीधर सोमा पाटील (वय ५४, नशिराबाद) यास अटक करण्यात आली़
तिसरी कारवाई दयावान ढाब्यावर करण्यात आली़ संतोष मोहन वाघ (वय २९, सुरभी चौक, नशिराबाद) यास अटक करण्यात आली तर चार हजार ९४५ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला़
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपनिरीक्षक युवराज अहिरे, एएसआय दिलीप कोळी, हवालदार प्रदीप पाटील, संदीप चौव्हाण, राजेश काळे, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, राहुल चौधरी, सुधीर विसपुते, अयाज सैय्यद, असमद सैय्यद आदींच्या पथकाने केली़  एकूण ३० हजार ५४३ रुपयांचा मद्य साठा जप्त करण्यात आला़
कल्याण मटका घेताना शहरात दोघांना अटक
भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगवाली चाळ भागात कल्याण मटका घेताना  संशयीत आरोपी शेख इरफान व एजाज मो़रशीद यांच्याकडून  दोन हजार १६० रुपयांचे सट्टा-जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले़ मोहम्मदविरुद्ध संदीप चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे़
दुचाकी घसरली, एक जण गंभीर जखमी
भुसावळ- भुसावळ-जामनेर रस्त्यावरील कुºहे पानाचे गावाजवळ दुचाकी (एम़एच़१९ सी़जी़३४४२) घसरल्याने किशोर लुटे (कुºहेपानाचे) हे गंभीररित्या जखमी झाले़ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमी लुटे यांना जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले़ 
चोरीच्या उद्देशाने फिरणाºया दोघांना अटक
भुसावळ- सराफा बाजारात चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणाºया  शेख सुलतान शेख मस्तान (वय २३, कंडारी) व जय रणजित बालवंश (१९, पीओएच कॉलनी, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली़

Web Title: Illegal liquor stock, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.