अल्पवयीन मुलीला पळवून बेकायदेशीर विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 09:58 PM2018-08-25T21:58:38+5:302018-08-25T21:59:05+5:30
पिंपळकोठा येथील सात जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
एरंडोल, जि.जळगाव : तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रूक येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवून आळंदी येथे बेकायदेशीर विवाह केल्याप्रकरणी एरंडोल न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
पिंपळकोठा बुद्रूक येथील धनराज चिंधू पाटील यांचा मुलगा शुभम याने व जीवन धनराज, राहुल नाना, मनोज, रमेश तसेच शुभमचे आई-वडील यांनी संगनमत करून गावातील एका अल्पयवीन मुलीला पळवून नेले व आळंदी येथे तिच्याशी बेकायदेशीर लग्न लावले, असा आरोप फौजदारी खटल्यात करण्यात आला आहे. याबाबत एरंडोल न्यायालयात भिकन दोधू मराठे यांनी वरील आरोपीविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे. न्यायाधीश नीतेश बंडगर यांनी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश १४ रोजी पारीत केला आहे. फिर्यादीतर्फे अॅड.रितेश अरुण देशमुख यांनी काम पाहिले.