नशिराबाद येथे बेकायदा गुटखा विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:27+5:302021-03-21T04:15:27+5:30
जळगाव : नशिराबाद येथील ख्वाॅजा नगर परिसरात बेकायदा पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ...
जळगाव : नशिराबाद येथील ख्वाॅजा नगर परिसरात बेकायदा पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. यात ३ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पानटपरीधारकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद येथील ख्वाॅजा नगर परिसरात साबीर रहेमान शेख (३६) हे पानटपरी चालविता. दरम्यान त्यांच्या पानटपरीवर बेकायदा पानमसाला व गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सुवर्णा महाजन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवार १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. पानटपरीधारक साबीर शेख यांच्या ताब्यात असलेला सुगंधी पानमसाला असा एकूण ३ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिकारी सुवर्णा महाजन यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात पानटपरीधारक साबीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.