नंदगावला गावकऱ्यांनी पकडले अवैध वाळूचे डंपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:41 PM2019-09-29T12:41:16+5:302019-09-29T12:41:50+5:30

जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथे शनिवारी सायंकाळी गावकऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. हे दोन्ही डंपर चिखलात ...

Illegal sand dumper seized by villagers in Nandgaon | नंदगावला गावकऱ्यांनी पकडले अवैध वाळूचे डंपर

नंदगावला गावकऱ्यांनी पकडले अवैध वाळूचे डंपर

Next

जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथे शनिवारी सायंकाळी गावकऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. हे दोन्ही डंपर चिखलात अडकले असून तहसीलदार व पोलीस पोहचण्याआधी या डंपरमधील वाळू हलविण्यात आली होती. दरम्यान, वाळू तस्करांच्या वाहनांमुळे शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होत आहे.
नंदगाव गावातून अवैध वाळूची तस्करी होत असल्याने रस्ते व शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे गावकºयांनी शनिवारी सायंकाळी रस्त्यावर उतरुन वाळू ने भरलेले दोन डंपर (क्र.एम.एच.१९ झेड ३२८५ व एम.एच.१९ झेड ४६८५) रस्त्यात अडविले. या डंपरमुळे वसंत पंडीत पाटील या शेतकºयाच्या मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले. घटनास्थळावरुनच गावकºयांनी तहसीलदार वैशाली हिंगे यांना माहिती दिली. तहसीलदार व मंडळाधिकारी दिनेश उगले हे तातडीने रवाना झाले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे देखील सहकाºयांस घटनास्थळावर पोहचले, मात्र अधिकारी पोहचण्याआधी डंपरमधील वाळू हटविण्यात आली होती, त्याचे फोटो गावकºयांनी काढून ठेवली असल्याची माहिती तहसीलदार हिंगे यांनी ‘लोकमत’ ला दिली. दोघं डंपर श्याम धोंडू कोळी यांच्या मालकीचे आल्याचेही तहसीलदार हिंगे यांनी सांगितले.

Web Title: Illegal sand dumper seized by villagers in Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव