अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 09:43 PM2019-12-16T21:43:00+5:302019-12-16T21:43:10+5:30
जळगाव - शहरातील आकाशवाणी चौकात सोमवारी प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे चार डंपर पकडल़े़ यावेळी ...
जळगाव- शहरातील आकाशवाणी चौकात सोमवारी प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे चार डंपर पकडल़े़ यावेळी पावत्यांची तपासणी केली असता त्या अवैध आढळून आल्यामुळे चारही डंपर जप्त करण्यात आले आहे.
वाळू माफीयांकडून तालुक्यातून सर्रास वाळू वाहतूक केली जात आहे़ त्याचबरोबर गिरणा नदीपात्रातून देखील दिवस-रात्री वाळूधारकांकडून अवैधरित्या उपसा करून वाळू वाहतूक केली जात आहे़ त्यामुळे महसुल विभागाच्या पथकांकडून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व डंपर चालकांविरूध्द कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे़ तर सोमवारी देखील प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांच्या पथकाने शहरातील आकाशवाणी चौकात एम़पी़३८़जी़०३९०, एम़एच़१९़झेड़५४१७, एम़एच़२८़एबी़७७०८, एमएच़१९़१३७१ या क्रमांकाचे वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले़ यावेळी चालकांकडून पावत्यांची मागणी केली असता त्या तपासणीअंती अवैध आढळून आल्या़ दरम्यान, पथकाने चारही डंपर जप्त केली आहेत.
कठोर कारवाई करणार
तालुक्यात होत असलेली सर्रास वाळू वाहतूक त्याचबरोबर वाळू डंपरांकडून होणारे रोजचे अपघाताच्या पार्श्वभूमीवर अवैध वाळू वाहतुक करणारे डंपर व ट्रॅक्टरचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.