सुनसगाव येथे अवैध वाळूसाठा, गौणखनिज खदान सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:40 PM2020-02-28T22:40:26+5:302020-02-28T22:41:57+5:30

सुनसगाव येथे गौणखनिजाची अवैध खदान आणि सुमारे तीन हजार अवैध वाळू साठा सापडला आहे.

Illegal sandstone, secondary mineral found at Sunsagaon | सुनसगाव येथे अवैध वाळूसाठा, गौणखनिज खदान सापडली

सुनसगाव येथे अवैध वाळूसाठा, गौणखनिज खदान सापडली

Next
ठळक मुद्देपहूर सर्कलची कारवाई कंपनी कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद उफाळला

सचिन पाटील
नेरी ता.जामनेर, जि.जळगाव : येथून जवळ असलेल्या सुनसगाव येथे गौणखनिजाची अवैध खदान आणि सुमारे तीन हजार अवैध वाळू साठा सापडला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पहूर मंडळ अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत तीन डंपर व एक पोकलॅन मशीन जप्त केले. यावेळी पोलीस पाटील यांना अरेरावी केल्याने ग्रामस्थ व कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होवून मोठा वाद उफाळला होता. मात्र कंपनीचे प्रोजेक्ट मनेजर पी.व्ही.श्रीनिवास यांनी जाहीर माफी मागितल्याने वादावर पडदा पडला. शुक्रवारी सायंकाळी सातला हा प्रकार घडला.
जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम स्पायरोडारा इन्फ्रास्टक्चर ही कंपनी करत आहे. या कामासाठी कंपनीने सुनसगाव येथे एका प्रशस्त शेतात आपला कॅप सुरू केला आहे. गावाच्या मागे वाघूर नदीला लागून कंपनीने गौणखनिजाची एक खदान सुरू केली आहे. या खदानीतून दररोज हजारो ब्रास मुरूम, खडी तयार करून वापरली जाते. मात्र ही खदानच अवैध पद्धतीने सुरू असल्याची माहिती शुक्रवारी जामनेर तहसीलदारांना गावातील काही नागरिकांनी दिली. तसेच या ठिकाणी अंदाजे जवळपास तीन हजार ब्रास वाळूसाठादेखील मोठी शक्कल लढवून लपवण्यात आला होता.
तहसीलदारांच्या आदेशाने पहूर मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर आणि स्थानिक तलाठी पृथ्वी भिवसने यांनी पंचनामा केला व येथे मुरुमाचे भरलेले तीन डंपर आणि एक पोकलॅन मशीन जप्त करून कंपनीच्या आवारात जमा केले. कागदपत्रे कंपनीने सादर केल्यानंतर पुढील कारवाई आणि दंड निश्चित केला जाईल, असे मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी सांगितले.
दुसरीकडे मात्र हा पंचनामा सुरू असताना कंपनीचे काही कर्मचारी आणि गावातील नागरिकांमध्ये वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होत असताना पोलीस पाटील समाधान महाजन यांनी नागरिकांना शांत केले. कंपनीचे प्रोजेक्ट मनेजर पी.व्ही. श्रीनिवास यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितल्याने वादावर पडदा पडला.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, खदानीची पाहणी केली. या ठिकाणी अंदाजे तीन हजार ब्रास वाळूसाठा आढळला. तसेच गौणखनिजाची खदानदेखील आढळून आली. येथे मुरूमने भरलेले तीन डंपर आणि एक पोकलॅन मशीन जमा करण्याची कारवाई सुरू आहे. अधिकृत कागदपत्रे सादर झाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल.
-प्रशांत निंबाळकर, मंडळ अधिकारी, पहूर


गैरसमजुतीमधून सदर प्रकार घडला आहे. आम्ही याप्रकरणी खेद व्यक्त करत संबंधितांची माफी मागितली आहे. वाळूसाठा आणि खदानीचे योग्य कागदपत्रे सादर केली जाईल.
-पी.व्ही.श्रीनिवास, प्रोजेक्ट मनेजर, स्पायरोडारा इन्फ्रास्टक्चर

कंपनीच्या एका कर्मचाºयाने अरेवारी केल्याने गावातील तरुण संतापले होते. त्यामुळेच हा वाद निर्माण झाला होता. मात्र श्रीनिवास यांनी माफी मागितल्याने हक वाद संपला आहे.
-समाधान महाजन, पोलीस पाटील, सुनसगाव
 

Web Title: Illegal sandstone, secondary mineral found at Sunsagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.