कुºहा परिसरात २६० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:30 AM2018-09-05T00:30:18+5:302018-09-05T00:32:51+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव व थेरोळा या दोन गावात केली कारवाई
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहा परिसरात महसूल विभागाने सायंकाळी अचानक केलेल्या कारवाईत रिगाव व थेरोळा या दोन गावात एकूण २६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे. पंचनाम्याच्याची माहिती व कारवाई यासंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.
कुºहा मंडळ अधिकारी मिलिंद बावस्कर तसेच कोराळ यांचे तलाठी धीरज ढेकणे व तलाठी एम.झरे, भाग्यश्री पाटील तसेच वेगवेगळ्या गावचे कोतवाल या सर्व पथकाने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुºहा परिसरातील कोºहाळा व थेरोडा या दोन गावांमध्ये अचानक कारवाई केली. दोन्ही गावात वेगवेगळ्या ठिकाणी वाळूचा साठा करण्यात आल्याचे आढळून आला. यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई महसूल प्रशासनाने केली आहे.
थेरोळा आणि कोराळा या दोन गावांमध्ये हा वाळू साठा आढळून आलेला आहे. मोठ्या संख्येने हा वाळू साठा करून ठेवण्यात आलेला होता. एकूण २६० ब्रास इतका हा वाळू साठा असून या संदर्भात मिलिंद बावस्कर व त्यांच्या पथकाने त्यावर कारवाई करून पंचनामा केलेला आहे. पंचनामा तसेच कारवाई संदर्भातला अहवाल तहसीलदारांकडे उद्या सादर केला जाणार असून महसूल प्रशासन दंडात्मक कारवाई काय करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. यापूर्वीदेखील तलाठी ढेकणे यांनी कुºहा येथे २५० च्या ब्रासवर वाळू जप्त केलेली होती. त्यानंतर मात्र महसूल प्रशासनाच्या या दणक्याने बेकायदेशीर वाळू साठा करणऱ्या वाळू माफियांवर चांगलाच बसणार आहे. पावसाळ्यापूर्वीच पूर्णा नदीला पूर येण्याआधी वाळूसाठा विक्रीसाठी केला जातो. यासाठी कोणत्याही परवाना न घेता वाळूसाठा हा केवळ स्वत:च्या फायद्यासाठी जमा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करून साठा करून त्याची विक्री पावसाळ्यात केली जाते व ही विक्री चढ्या दराने केली जात असल्याने पावसाळ्यातील वाळूला फार मोठी मागणी असते.
यासंदर्भात मंडळाधिकारी मिलिंद बाविस्कर यांना विचारले असता गुप्त माहितीवरून आपणही कारवाई केली असून कारवाई संदर्भातला अहवाल वरिष्ठांकडे उद्या सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.