जळगाव-बोदवड रस्त्यावर अवैध गौणखनिज वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 03:20 PM2020-06-03T15:20:30+5:302020-06-03T15:21:58+5:30
जळगाव-बोदवड रस्त्यावर भरधाव धावणाऱ्या डंपरने कुºहे (पानाचे) येथे डंपरने रात्रीच्या वेळेस पुलाला धडक दिली.
भुसावळ, जि.जळगाव : जळगाव-बोदवड रस्त्यावर रेतीची सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे. भरधाव धावणाऱ्या या डंपरने कुºहे (पानाचे) येथे डंपरने रात्रीच्या वेळेस गावाशेजारील पुलाला जोरदार धडक दिली. ही घटना मंगळवारी घडली. सुदैवाने या घटनेत अप्रिय घटना घडली नाही. मात्र यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव-बोदवड रस्त्यावरून दररोज शेकडो डंपर भरधाव वेगाने अवैध गौणखनिज व रेतीची सर्रास वाहतूक करीत आहे. कुºहे (पानाचे) गावाजवळून भरधाव वेगाने डंपर जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी एका डंपरने रात्रीच्या वेळेस गावाशेजारील मारुती मंदिराजवळील फुलाला जोरदार धडक दिली. यावेळी तरीही डंपर न थांबता तीन-चार वीज खांबानाही धडक देऊन ओढत नेले. मात्र तरीही डंपर थांबले नाही. फुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सहा महिन्यापूर्वी ही याच रस्त्यावर गावाशेजारी एका मोटारसायकल वाल्याला धडक देऊन डंपर फरार झाले होते. यासंदर्भात तालुका पोलीस स्टेशनला मोटरसायकल जमा करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाला किंवा नाही यासंदर्भात माहिती मिळू शकली नाही, तर फुलाच्या जवळपासच एका पायी जाणाºया शेतकºयालाही भरधाव येणाºया डंपरने चिरडले होते. तरीही ही महसूल व पोलीस प्रशासनाने या डंपरचा बंदोबस्त केलेला नाही.
दरम्यान, डंपरवर केवळ १६ ते १७ वयोगटातील अज्ञान बालके चालकाची भूमिका बजावत आहे, डंपरच्या मागे किंवा पुढे ठेकेदाराचे चार ते पाच गुंड प्रवृत्तीच्या लोक चार चाकी वाहनाने जात असल्याचे दिसून येते. गुंडाच्या खास बंदोबस्तात अवैध रेती व वाळूच्या गाडी नेत असल्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन कधी लोभ तर कधी भीतीपोटी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
तरी नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या डंपराचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.