भडगाव तालुक्यात अवैध वृक्षतोडीने केला कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:37+5:302021-06-09T04:20:37+5:30

बांधकामे दोन्ही सुरू असल्याने कोरोनातील व्यक्तींना जळण व बांधकाम क्षेत्रातील इमारतींना दरवाजे, चौकट आदी कामांसाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड ...

Illegal tree felling in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यात अवैध वृक्षतोडीने केला कहर

भडगाव तालुक्यात अवैध वृक्षतोडीने केला कहर

Next

बांधकामे दोन्ही सुरू असल्याने कोरोनातील व्यक्तींना जळण व बांधकाम क्षेत्रातील इमारतींना दरवाजे, चौकट आदी कामांसाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. वृक्षतोडीमुळे ऑक्सिजनचा समतोलही बिघडत असून त्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. भडगाव तालुक्यात शेत माळरानात, गिरणा काठावर लिंब, आंबे, चिंच, बाभूळ यासह उंच डेरेदार हिरवे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. मात्र विनापरवाना हिरवी जिवंत झाडे तोडण्याचा जणू अवैध वृक्षतोड करणाऱ्यांनी धूमधडाकाच लावला आहे.

सध्या शेतीबांध मोकळे असून बांधावरील तालुक्यातील शेकडो मोठे डेरेदार वृक्षतोड झाल्याचे दिसून येत आहे. तोड झालेल्या वृक्षांची वन व महसूल विभागाच्या विनापरवानगी वाहतूक होत आहे. पहाटे व दुपारी सायंकाळी शांततेचा फायदा घेत शहरातून चोरट्या मार्गाने वाहतूक होताना दिसते. मात्र, दुपारी या चोरट्या वृक्षतोडीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. ही तोडलेल्या झाडांची लाकडे ट्रॅक्टरने शहरातील साॅ मिलवर आणली जातात. मग या साॅ मिलवर एवढी लाकडे येतात कुठून? वीटभट्ट्यांवरही मोठ्या प्रमाणात लाकडे येतात. शहरात काही भागात, गिरणा काठालगत लाकडांचे मोठे ढिगारे नजरेस पडतात. मग ही लाकडे एवढी कुठून आणली जातात. मागे वादळात अनेक झाडे पडून नुकसान झाले होते. मात्र हे पडलेल्या झाडांच्या नावाखाली सध्याही विनापरवाना ट्रॅक्टरने लाकूड वाहतूक होताना दिसते. यावर वनविभागाचाही अंकुश दिसून येत नाही.

भडगाव तालुक्यात होणाऱ्या अवैध वृक्षतोडीला आळा बसवावा. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखावा, अशी मागणी शहरासह तालुक्यातून होताना दिसत आहे.

===Photopath===

080621\08jal_7_08062021_12.jpg

===Caption===

भडगाव तालुक्यात अशी लिंबाच्या झाडांची सर्रास तोड सुरु आहे.

Web Title: Illegal tree felling in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.