पद्मालय परिसरात अवैध वृक्षतोड थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 09:08 PM2019-09-24T21:08:42+5:302019-09-24T21:08:46+5:30
एरंडोल : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेचा नारा वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग या यंत्रणांतर्फे नारा दिला जातो. ...
एरंडोल : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेचा नारा वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग या यंत्रणांतर्फे नारा दिला जातो. मात्र तालुक्यातील पद्मालय परिसरात अवैधरीत्या झाडांची कत्तल सर्रास केली जात आहे. वृक्षतोडीसंदर्भात दलाल व व्यापा-यांचे मोठे नेटवर्क सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.
पद्मालय परिसरात वनपरिक्षेत्र आहे. मात्र या ठिकाणी सर्रास अवैध वृक्षतोड होत असून नागरकांतून नाराजी व्यक्त होत आहे. ताडे, बाम्ह्ने, निपाणे आदी गावांकडून रोज तीन ते चार ट्रक लाकडे भरून रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास जळगाव व धरणगाव कडे जातात. हा प्रकार सर्रासपणे कसा केला जातो याबाबत संशय निर्माण झाला असून नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाने विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांकडून होत आहे.