बाळद रोड, तळणी परिसरातील विकासकामे तत्काळ मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:17 AM2021-09-26T04:17:36+5:302021-09-26T04:17:36+5:30
तरी अजूनपर्यंत काहीही हालचाल करण्यात आली नाही. तळणी परिसराची जागा महसूल विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी भडगाव नगर परिषदेकडे शहर विकास ...
तरी अजूनपर्यंत काहीही हालचाल करण्यात आली नाही. तळणी परिसराची जागा महसूल विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी भडगाव नगर परिषदेकडे शहर विकास आराखड्यामध्ये मंजूर बगीचा विकसित करण्याच्या कामासाठी दोन वर्षांपूर्वी हस्तांतरित केली आहे, तरीही विकासकामे तत्काळ मार्गी लावण्याची विनंती अमोल नाना पाटील यांनी निवेदनाद्वारे भडगाव नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभागातील साईनगर, विद्यानगर, कमलनगर, विवेकानंदनगर, एकवीरा भाग -१, एकवीरा भाग -२, महालक्ष्मी कॉलनी, गणेश कॉलनी, बालाजीनगर, उज्ज्वल कॉलनी, शिवाजीनगर परिसरातील विविध ओपन स्पेस विकसित करणे. एकता कॉलनी, श्रीरामनगर, श्रीसाईनगर भागातील रस्ते व गटारी, तसेच एकवीरानगर भाग-१ मधील बाळद रोड ते तळणीपर्यंतच्या रस्त्याची कामे तत्काळ करण्यात यावीत, या कामांचे ठराव यापूर्वीच झाले आहेत.
नव्याने अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेऊन संबंधित विकासकामांची गरज व गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यात यावीत, असेही या निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, युवा मोर्चा सरचिटणीस प्रदीप सोमवंशी आदी उपस्थित होते.