जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त केळी बागांचे तातडीने पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:14 AM2021-06-02T04:14:56+5:302021-06-02T04:14:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात केळी बागांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात केळी बागांचे मोठे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दूरध्वनी करून निर्देश दिले आहेत.
रावेर तालुक्यात खेर्डी, विटवा ऐनपूर, निंबोल, सुरवाडी, वाघाडी या परिसरात जोरदार पाऊस झाला झाला. गावांमधील अनेक घरांचे पत्रे उडून गेले. केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन व राज्य सरकार खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले.
तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या केळी बागांची लवकर पंचनामे करण्याचे निर्देश देते वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी राऊत यांना दूरध्वनीवरून दिले आहेत.