थायरॉईडची तात्काळ तपासणी केली तर जीव वाचू शकतो: गिरीश महाजन

By सुनील पाटील | Published: March 30, 2023 07:28 PM2023-03-30T19:28:27+5:302023-03-30T19:29:30+5:30

‘मिशन थायरॉईड’ अभियानाची सुरुवात जळगावपासून

Immediate thyroid screening can save lives: Girish Mahajan | थायरॉईडची तात्काळ तपासणी केली तर जीव वाचू शकतो: गिरीश महाजन

थायरॉईडची तात्काळ तपासणी केली तर जीव वाचू शकतो: गिरीश महाजन

googlenewsNext

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: राज्याच्या वैद्यकिय शिक्षण विभागाच्यावतीने आरोग्याच्यासंदर्भात सात अभियान हाती घेतले आहेत, त्यातील ‘मिशन थायरॉईड’ या जनजागृती व उपचार अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात गुरुवारी जळगावपासून झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कक्षाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते झाले. यापूर्वीही दोन अभियानाची सुरुवात जळगावातून झाली आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, आमदार सुरेश भोळे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, मिशन थॉयरॉईड अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. पारोजी बाचेवार उपस्थित उपस्थित होते.

थायरॉईडची तपासणी वेळोवेळी केली पाहिजे. अनेकांना हा आजार झाल्याचे कळतही नाही. वेळेवर निदान झाले पाहिजे, असे झाल्यास आपण आजारावर मात करु शकतो, रुग्ण वाचू शकतो, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. अल्पवयीन मुलांपासून ते तरुण लोकांपर्यंत तंबाखू खाणे, बिडी ओढणे, गुटखा खाणे यासारखे विविध नशा करत आहे. त्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.  यापेक्षा व्यायाम करा, चांगले आहार घ्या. शरीर तंदुरुस्त ठेवा. तरुणांनी वाईट गोष्टींपासून लांब रहावे, असाही सल्ला त्यांनी दिला. डॉ. अजय चंदनवाले यांनी अभियान कसे राहील, त्याचे स्वरूप सांगितले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी रुग्णालयातील थॉयरॉईड ओपीडीविषयी माहिती दिली. याप्रसंगी अभियानाचे फलक हातात घेऊन मान्यवरांनी उदघाटन केले. सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले. आभार डॉ. मारोती पोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमुख, डॉक्टर्स, अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Immediate thyroid screening can save lives: Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव