दोंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाला तत्काळ अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:42 PM2018-02-19T17:42:20+5:302018-02-19T17:45:30+5:30
तेली समाजातर्फे पोलीस अधीक्षकांना आंदोलनाचा इशारा
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१९ : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे पाच वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा तेली समाजातर्फे निषेध नोंदविण्यात आला. नराधमाला तत्काळ अटक करावी व पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. संशयिताला अटक झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाने दिला आहे.
जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव जिल्हा तेली समाज महासभा, जळगाव शहर तेली युवक आघाडी, संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था, संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ व तेली समाज बहुउद्देशीय मंडळ, शेंदुर्णी, अखिल भारतीय छावा संघटना, महाराष्टÑ विश्वकर्मा सेना नारी शक्ती संघटना आदी संघटना सोमवारी एकत्र आल्या होत्या.
जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर.टी.चौधरी, अनिल सोमा चौधरी, शोभा चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, प्रशांत सुरडकर, महेश चौधरी, रवींद्र चौधरी, विनोद चौधरी, दिलीप चौधरी, नेताजी पाटील, दुर्गेश चौधरी, सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, डॉ.विलास चौधरी, भगवान चौधरी, उमेश चौधरी, भरत चौधरी, सुनील चौधरी, कमलेश चौधरी, गिरीश चौधरी, विजय चौधरी, भागवत चौधरी यांच्यासह छावाच्या विभागीय अध्यक्ष वंदना पाटील, पूनम खैरनार आदी उपस्थित होते.