अवकाळी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 05:11 PM2019-10-27T17:11:19+5:302019-10-27T17:11:41+5:30

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पिकांची पाहणी

Immediately report the loss of time | अवकाळी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

अवकाळी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

googlenewsNext



चाळीसगाव : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे काढणाºया अवकाळी पावसाने गेल्या दहा दिवसांपासून चाळीसगाव परिसरात तंबूच ठोकला आहे. पावसाची संततधार असल्याने खरीप हंगाम मातीमोल झाला असून नवनिर्वाचित आमदार मंगेश चव्हाण यांनी सोमवारी खडकी बुद्रुक भागातील बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. नुकसानीचे सरसकट व तत्काळ पंचनामे करा. जलद गतीने मदत देखील पोहचवा, अशा सूचनाही त्यांनी महसूल विभागाला दिल्या आहेत. ‘लोकमत’ने देखील बळीराजाची व्यथा ठळकपणे मांडून पंचनामे होत नसल्याची कैफियत थेटपणे मांडली होती.
गेल्या दहा दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने अस्मानी संकट उभे राहीले आहे.
ज्वारी, बाजरी, मका अश्या पिकांना कोंब फुटले असून मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. शेतात पाणी साचल्याने कपाशीचे पीकही सडत आहे.
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे संकट बळीराजापुढे उभे ठाकले आहे. झालेला खर्च सुद्धा निघणार नाही. नुकसानीची तीव्रता अशी भयावह असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांना या संकटातून सावरण्यासाठी कोणताही कसूर ठेवणार नसल्याचे सांगत मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गिरीष महाजन व जिल्हाधिकारी यांना माहिती दिल्याचे यावेळी सांगितले. पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना तत्काळ विमा क्लेम अदा करावा. याबाबत जिल्हाधिकाºयांना विनंती केली.
त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच होणाºया अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकºयांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Immediately report the loss of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.