अपूर्ण कर्मचाºयांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 12:18 AM2017-04-12T00:18:31+5:302017-04-12T00:18:31+5:30

लोहारा : प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रतीक्षा

Impact on health service due to incomplete employee | अपूर्ण कर्मचाºयांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम

अपूर्ण कर्मचाºयांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम

Next

लोहारा, ता. पाचोरा : अपूर्ण कर्मचाºयांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, त्याचा फटका रुग्णांना बसत असल्याचे चित्र आहे. यासाठी लोहारा आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरली जाणे आवश्यक आहे.
पाचोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रांपैकी लोहारा हे एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे.
 सध्या आरोग्य केंद्राची अवस्था अपूर्ण कर्मचाºयांमुळे अत्यंत नाजूक झालेली आहे. त्याचा परिणाम आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे.                                                     लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्र्रांतर्गत १९ गावांचा समावेश आहे. तसेच या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण ३२ हजार लोकसंख्या येते. त्यामुळे या आरोग्य केंद्र्रात पुरेसे कर्मचारी असणे गरजेचे आहे.
या आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्रे आहेत. त्यात कुºहाड, कळमसरा, कासमपुरा, आंबेवडगाव व लोहारा या गावांमध्ये ही उपकेंद्रे सुरू आहेत. या सर्व उपकेंद्रांमध्ये एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सेविकेचे पद असणे गरजेचे आहे. मात्र कळमसरा व आंबेवडगाव येथे आरोग्य सेवकाचे पद रिक्त आहे, तर लोहारा उपकेंद्रात एका आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. तसेच येथे एक पुरुष व एक स्री पर्यवेक्षक आवश्यक असताना ही दोन्ही पदे येथे रिक्त आहेत. या केंद्रात एका शिपायाचीदेखील जागा रिक्त असल्याची माहिती या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिल पांढरे यांनी दिली.                   
या केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाºयांची गरज आहे. तसे रेकॉर्डला दोन वैद्यकीय अधिकारीदेखील आज रोजी प्रत्यक्ष दिसून येत असले तरी येथील एक वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद चौधरी यांना नेरी येथील आरोग्य केंद्रावर तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. परिणामी लोहारा आरोग्य केंद्रात आज खºया अर्थाने एकच वैद्यकीय अधिकारी काम करताना दिसून येतो.
सुमारे ३२ हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे, हे विशेष. त्याचप्रमाणे येथे शवविच्छेदनगृह गेल्या १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आले. ते जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्या सुनीता  शेळके यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले होते. मात्र जेमतेम तीन ते चार वर्षे येथे प्रेतांचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मात्र येथे प्रशिक्षित एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी मिळाला नाही. परिणामी लाखो रुपये खर्च करून उभारलेले हे शवविच्छेदनगृह धूळखात पडलेले आहे. या सर्व समस्या त्वरित सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्या रेखा राजपूत व पंचायत समिती सदस्या अनिता चौधरी यांनी विशेष लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 
 लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या संरक्षक भिंत अतिशय खराब झाली आहे.
 आत प्रवेश करण्यास सहज जागा आहे. यामुळे या केंद्रात गुरांचा व रिकामटेकड्यांचा वावर वाढला आहे.
 त्याचप्रमाणे या आरोग्य केंद्राची दुरुस्ती व रंगरंगोटीदेखील होणे गरजेचे आहे. आजच्या स्थितीत आरोग्य केंद्रांतर्गत वॉर्डाची स्थिती चांगली आहे.
  या आरोग्य केंद्रात सर्व प्रकारच्या लसी, औषधसाठा उपलब्ध आहे. कुत्रा चावल्यास, सर्पदंश झाल्यास त्यावरीलही लसी उपलब्ध आहे. उष्माघात कक्ष येथे सुरू आहे. 
 असे असले तरी अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे वैद्यकीय उपचारात अडचणी निर्माण होतात.
वैद्यकीय अधिकाºयांची दोन पदे कागदोपत्री भरलेली दिसत असली तरी एकाची नेरी येथे प्रतिनियुक्ती
 एकाच वैद्यकीय अधिकाºयावर चाललाय आरोग्य केंद्राचा गाडा
 पाच उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी एक आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेची पदे भरलेली असणे गरजेचे, मात्र कळमसरा व आंबेवडगाव येथे आरोग्य सेवकाचे पद रिक्त, तसेच लोहारा आरोग्य उपकेंद्रातही आरोग्य सेविकेचे पद रिक्त

Web Title: Impact on health service due to incomplete employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.