आर्थिक दुर्बल सहाय्य योजना कार्यान्वित करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:15 AM2021-05-30T04:15:20+5:302021-05-30T04:15:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खान्देशातील विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक सहाय्य योजना विद्यापीठाच्यावतीने कार्यान्वित करण्‍यात यावी, अशी मागणी नॅशनल ...

Implement a financially weak support plan ... | आर्थिक दुर्बल सहाय्य योजना कार्यान्वित करा...

आर्थिक दुर्बल सहाय्य योजना कार्यान्वित करा...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : खान्देशातील विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक सहाय्य योजना विद्यापीठाच्यावतीने कार्यान्वित करण्‍यात यावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंस्‌ युनिअन ऑफ इंडिया संघटनेच्यावतीने विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

विद्यार्थ्यांना बोटावर मोजण्या इतक्याच शासनांच्या योजनांचा लाभ मिळतो, त्या अनुषंघाने एनएयुआयच्या शिष्टमंडळाने नुकतीच प्रभारी कुलसचिव शामकांत भादलीकर यांची भेट घेतली व आर्थिक दुर्बल सहाय्य योजना विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात यावी, अशी मागणी केलीृ त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या होणाऱ्या सत्र परीक्षा शुल्क विद्यापीठाने खूप जास्त प्रमाणात आकारली आहे. हे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे किंवा भरले गेलेल्या परिक्षा अर्ज शुल्क योग्य त्या उपाय योजना करून शुल्क परत करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी प्रभारी कुलसचिवांना देण्यात आलेल्या निवेदनावर ॲड. संदीप पाटील व अमीर शेख, सोहन सोनवणे, परेश पवार, मजीत तडवी, हर्षवर्धन पवार आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Web Title: Implement a financially weak support plan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.