पाणीपुरवठा योजना प्राधान्याने तातडीने राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:26+5:302021-07-30T04:16:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पारोळा : गावातील शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. जुन्या काळातील मंजूर योजना बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : गावातील शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. जुन्या काळातील मंजूर योजना बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत, त्यासाठी सद्य:स्थितीत गावाच्या आराखड्याचा अभ्यास करून नवीन वाढीव पूर्तता करून नव्याने मंजूर करा, वर्षानुवर्षे पाणीटंचाई भासणाऱ्या गावांना प्राधान्याने पाणीपुरवठा योजना तातडीने राबवा, अशा सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी तालुक्याच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा योजनेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी हिरे, उपअभियंता धीरज पाटील, पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी. पाटील, मा. नगराध्यक्ष दयाराम पाटील, पारोळा बाजार समिती संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, पारोळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातून आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींकडून आपल्या गावांचा पाणीपुरवठा योजनेचा गावनिहाय आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना संबंधित गावांचा समस्या त्वरित दूर करण्याचे आदेश दिले.