दोन महिन्यात राज्यात अपंग धोरणाची अंमलबजावणी : राजकुमार बडोले

By Admin | Published: April 30, 2017 03:15 PM2017-04-30T15:15:56+5:302017-04-30T15:15:56+5:30

जळगावातील दिव्यांग निवासी प्रशिक्षण केंद्राचा पॅटर्न राज्यभरात राबविण्याचे आश्वासन. दिव्यांग स्वावलंबन योजनेची जळगावातून सुरुवात करणार

Implementation of Disability Policy in two months: Rajkumar Badolay | दोन महिन्यात राज्यात अपंग धोरणाची अंमलबजावणी : राजकुमार बडोले

दोन महिन्यात राज्यात अपंग धोरणाची अंमलबजावणी : राजकुमार बडोले

googlenewsNext

 जळगाव,दि.30- अपंग धोरणातील 18 मुद्यांसंदर्भात इंटरनेटच्या माध्यमातून अभिप्राय मागविण्यात आले असून येत्या दोन महिन्यात हे धोरण राज्यात लागू केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी जळगावात केली. जळगाव दौ:यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. 
जळगावातील पॅटर्न राज्यभर राबविणार
जळगावातील दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी सुरू केलेल्या दिव्यांग निवासी प्रशिक्षण केंद्राचा पॅटर्न राज्यभरात राबविणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 
दिव्यासांठी 300 मुला-मुलींची क्षमता असलेले वसतीगृह तयार करण्याचा मानस असून यासाठी राबविण्यात येणा:या दिव्यांग स्वावलंबन योजनेची सुरुवात जळगावातून करण्यात येईल, अशीही माहिती बडोले यांनी दिली. 
दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ
दिव्यांग मुला-मुलींना शिक्षण तर मिळत आहे, मात्र त्यात त्यांना अनेक अडचणी येतात.  हे टाळण्यासाठी अशा मुला-मुलींसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचाही मानस असल्याचे बडोले म्हणाले. 

Web Title: Implementation of Disability Policy in two months: Rajkumar Badolay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.