शिक्षक भरतीबाबत महत्वाची माहिती, स्व-प्रमाणपत्राला मुदतवाढ!

By अमित महाबळ | Published: September 17, 2023 08:58 PM2023-09-17T20:58:17+5:302023-09-17T20:59:02+5:30

चाचणी दिलेल्या उमेदवारांना दि. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती.

Important information regarding teacher recruitment extension of self-certificate! | शिक्षक भरतीबाबत महत्वाची माहिती, स्व-प्रमाणपत्राला मुदतवाढ!

शिक्षक भरतीबाबत महत्वाची माहिती, स्व-प्रमाणपत्राला मुदतवाढ!

googlenewsNext

जळगाव : फेब्रुवारी व मार्च महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक भरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२’ घेण्यात आली होती. यातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.    

चाचणी दिलेल्या उमेदवारांना दि. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती. परंतु, राज्यातील काही भागात इंटरनेट व्यवस्थित सुरू नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे दि. १४ पर्यंत पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणे अनेक उमेदवारांना मुदतीत शक्य झाले नाही. त्यामुळे यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये ही चाचणी घेण्यात आली होती. त्यासाठी २, ३९, ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर २,१६,४४३ उमेदवारांनी चाचणी दिली. 

जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत, ते नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक / शिक्षक भरतीसाठी पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. प्रमाणीकरण करीत असताना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा. त्यावर लवकरात लवकर उत्तर देण्यात येईल. यासाठी कोणताही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क करू नये. 

उमेदवारांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
 

Web Title: Important information regarding teacher recruitment extension of self-certificate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.